पुन्हा एकदा वृक्षांवर संक्र ांत
By admin | Published: April 28, 2015 10:30 PM2015-04-28T22:30:14+5:302015-04-28T22:30:14+5:30
पेण रस्त्यावर खाजगी ठेकेदाराकडून विद्युत वाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे,
अमोल पाटील ल्ल खालापूर
खोपोली - पेण रस्त्यावर खाजगी ठेकेदाराकडून विद्युत वाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे खोपोली-पाली राज्यमार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल होत असतानाही खालापूर तालुक्यातील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अशा वनसंपदा नष्ट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर सर्रास वृक्षतोड सुरू असल्याचे प्रकरण ताजे असतानाच खालापूर तालुक्याच्या खोपोली - पेण रस्त्यावरील वावोशी - जांभिवली - आजिवली हद्दीपासून ते तांबाटी हद्दीपर्यंत झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. जांभिवली येथील कंपनीसाठी तांबाटी येथील महावितरण सब-स्टेशन एक्स्प्रेस फिडरची वीज वाहून नेण्यासाठी महावितरणने परवानगी दिल्यानंतर रस्त्यालगत विद्युत खांब उभे करून विद्युत वाहक तारा टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तारा वाहून नेण्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या फांद्या तोडल्या जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासह खालापूर वन आणि महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे निसर्गाची हानी होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे, तर दुसरीकडे पाली - खोपोली रस्त्यालगत पालीफाटा ते मिरकुटवाडी दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे.
महावितरणने संबंधित कंपनीला विजेची परवानगी दिली असून झाडे तोडण्यासाठी कसलीही परवानगी देण्यात येत नाही.
- निखिल मेश्राम, उप-अभियंता खोपोली, महावितरण.
पाली फाटा रु ंदीकरणासाठी ज्या पद्धतीने वृक्षांची कत्तल केली आहे, तो प्रकार भयानक आहे. विकासाला विरोध नाही. या प्रकाराविरोधात न्यायालयात जाणार आहे.
- विनय कुलकर्णी,
पर्यावरणप्रेमी, खोपोली.
वन विभाग सुस्त तर महसूल विभाग ढिम्म
४याबाबत पर्यावरणप्रेमींनी खालापूर वन विभागाकडे तक्र ार केली असून वावोशी विभागातील वन कर्मचाऱ्यांकडे कारवाईसाठी आग्रह धरला असताना केवळ फांद्याच तोडल्या आहेत, असे उत्तर मिळाल्याने वन विभागाच्या एकूण कारभारावर संशय उपस्थित होत आहे. बंधनकारक नसलेली झाडे तोडण्यासाठी अथवा फांद्या छाटण्यासाठी तहसीलदारांची परवानगी घेणे बंधनकारक असताना संबंधितांनी परवानगी घेतली नसल्याने महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे डोळे लागले आहेत.
रोड सेफ्टी धोक्यात
४वीजवाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना थेट रस्त्यावर विजेच्या तारांचे बंडल ठेवण्यात येत असते. शिवाय तारा ओढणारे कामगार दूरवर रस्त्यावरूनच तारा ओढण्याचे काम करीत असताना राज्यमार्ग सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान, हे काम करताना संबंधितांकडून रोड सेफ्टीसाठी कसलेही नियम पाळण्यात येत नसून रस्त्यावर अपघात होण्याचा धोका आहे.