Join us  

विनय आपटे प्रतिष्ठानचा एकांकिका महोत्सव

By संजय घावरे | Published: June 11, 2024 4:21 PM

१७ जून रोजी संध्याकाळी ७:३० वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये विनय आपटे प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई - दिवंगत अभिनेते विनय आपटे यांच्या पश्चात उदयोन्मुख कलावंत-तंत्रज्ञांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या विनय आपटे प्रतिष्ठानचा दहावा वर्धापन दिन सोहळा एकांकिकांच्याच्या माध्यमातून साजरा होणार आहे. या वेळी दाखवण्यात येणाऱ्या एकांकिका प्रेक्षकांना विनामूल्य पाहायला मिळणार आहेत.

१७ जून रोजी संध्याकाळी ७:३० वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये विनय आपटे प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात मुलुंडमधील विनायक गणेश वझे कॅालेजची विविध पुरस्कार विजेती 'एकूण पट १' आणि ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञान साधना कॅालेजची 'उणिवांची गोष्ट' या दोन एकांकिका सादर केल्या जाणार आहेत.

टॅग्स :मुंबईविनय आपटे