Join us

सृजनोत्सवमध्ये सादर झाल्या 'तिनसान' आणि 'शान पन देगा देवा' एकांकिका

By संजय घावरे | Published: May 16, 2024 8:24 PM

खूप कडक शिस्तीत तालीम घेऊन नाटक, एकांकिका, नाट्य अभिवाचन असे विविध उपक्रम राबवत आहेत.

मुंबई- लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, नाट्य प्रशिक्षक राजेश देशपांडे यांच्या 'सृजन द क्रिएशन' या संस्थेचा चौथा वर्धापन दिन नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरात साजरा करण्यात आला. या निमित्त विठ्ठल सावंत लिखित 'तिनसान' आणि राजेश देशपांडे लिखित 'शान पन देगा देवा' या दोन मालवणी भाषेतील धमाल एकांकिका सादर करण्यात आल्या. 

गणेश वंदनेने वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. याच दिवशी असलेला लेखक विठ्ठल सावंत यांचा वाढदिवस रंगमंचावर केक कापून साजरा करण्यात आला. त्यानंतर किशोरवयीन मुलांनी धमाल प्रहसन सादर करून प्रेक्षकांना खळखळून हसविले. कोविड काळात ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या सृजनच्या कार्यशाळेचा पसारा आज जगभर पसरलेला आहे. नवोदितांना रंगमंचावर आपली कला सादर करता यावी म्हणून गेली चार वर्ष देशपांडे विध्यार्थांना नाट्यविषयक प्रशिक्षण देत आहेत.

खूप कडक शिस्तीत तालीम घेऊन नाटक, एकांकिका, नाट्य अभिवाचन असे विविध उपक्रम राबवत आहेत. चार वर्षांत विविध स्पर्धांमधून सहभागी कलाकारांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. नाटक, मालिका, चित्रपटांतून त्यांच्या कलाकारांना संधी मिळाली आहे. काही नाट्य प्रशिक्षक फक्त नाट्य शिबिरे घेतात, पण देशपांडे समारोपाच्या दिवशी सर्व वयोगटातील सहभागी विद्यार्थ्यांचा नृत्य-नाट्याचा समावेश असलेला कार्यक्रम सादर करतात.

टॅग्स :मुंबई