कळंबोली : सिडको वसाहतीतील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडीत काढण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे. त्यानुसार मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. बाविस्कर यांच्यासह सर्व अधिकारी या मोहिमेकडे विशेष लक्ष्य ठेवून आहेत. गेल्या दीड वर्षात सुमारे पाच हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यास प्रशासन आणि नियुक्त केलेल्या एजन्सीला यश आले आहे. आगामी काळात जास्तीत जास्त निर्बिजीकरण करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.
पनवेल परिसरात सिडकोने नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, उलवे, द्रोणागिरी, तळोजा, नावडे, करंजाडे हे नोड विकसित केले आहे. 21 व्या शतकातील विकसित शहर हे ब्रीद घेऊन निर्माण केलेल्या या वसाहतीत पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडको प्रशासनाची आहे. त्याचबरोबर या भागात रहिवाशांना भेडसावणा:या समस्या मार्गी लावण्याचे कामही प्रशासनाचे आहे. रस्ते, पाणी, गटारे या मुलभूत सुविधा सिडकोकडून पुरवल्या जात असल्या तरी या भागात भटक्या कुत्र्यांची दहशत मोठय़ा प्रमाणात होती.
आजही ती काही प्रमाणात आहे. दरम्यान या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी सिडकोने आसुडगाव बसडेपोजवळ जागा देवून त्याकरिता एक एजन्सी पूर्वी नियुक्त केली होती. मात्र त्या ठिकाणी त्या संस्थेने निर्बिजीकरण केले नाहीच त्याचबरोबर सिडकोबरोबर सातत्याने वाद घालण्याचे काम केले. करारनामा संपला तरी ती जागा सोडण्यास संस्थाचालक तयार नव्हते. त्याकरिता थेट न्यायालय त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना साकडे घालत प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रय} केला गेला. त्यामुळे गेल्या काही वर्षात सिडको वसाहतीत कुत्र्यांचा उपद्रव वाढत गेला. त्याचबरोबर श्वानदंशाचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे प्रशासना विरोधात असंतोष निर्माण झाला.
रस्त्यावरुन चालताना लहान मुले, महिला आणि वृद्धांना भय वाटू लागले याचे कारण म्हणजे कुत्र्यांची टोळकी अंगावर येत असत. इतकेच काय तर दुचाकीचा पाठलाग करुन त्रस देण्याचे कामही हे भटके प्राणी करत असत. त्यातच जागा आणि जुन्या संस्थेने घातलेला घोळ या सर्व गोष्टींचा विचार करुन आरोग्य विभागाने प्रशासनाकडे दुस:या जागेची मागणी केली. त्यानुसार नवीन पनवेल येथील पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. गेल्या दीड वर्षापासून निर्बिजीकरणाचे काम जोरात चालू असल्याचे अधिका:यांनी सांगितले. (वार्ताहर)
दर तीन दिवसांनी तीस कुत्र्यांचे निर्बीजीकरण
आय.डी.ए या नामांकित एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. 17 डिसेंबर 2क्12 ते मे 2क्14या कालावधीत संबंधित संस्थेने चांगले काम केले असल्याचे आरोग्य निरिक्षक नंदकिशोर परब यांनी सांगितले. प्रत्येक कुत्र्याला पकडून त्याची नसबंदी करण्यासाठी 55क् रुपये अदा केले जात आहेत. मात्र ही रक्कम परवडत नसल्याचे संबंधित संस्थाचालकांचे म्हणणो आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी शस्त्रक्रिया केली जात असून कमीत कमी तीस कुत्र्यांची नसबंदी केली जात असल्याचे परब यांनी सांगितले. आतार्पयत 5564 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली असून त्यामध्ये 2749 नर आणि 2815 मादी आहेत. त्याचबरोबर आजारी कुत्र्यांवरही उपचार करण्याचे काम केले जाते. सध्या 11 कुत्र्यांवर उपचार सुरु आहेत. आयडीए या संस्थेकडे वाहन, पिंजरे त्याचबरोबर दोन डॉक्टर, 1 सर्जन, व्हेटर्नरी आणि व्यवस्थापक प्रत्येकी दोन आणि वॉर्डबॉय 5 आहेत.
आम्ही पोदी येथे अत्याधुनिक स्वरुपाचे निर्बिजीकरण केंद्र उभारले असून आता भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी झाला आहे. तक्रारींचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. आगामी काळात जास्तीत जास्त कुत्र्यांची नसबंदी करण्याचा आमचा मानस आहे. सिडकोवासियांना भयमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यानुसार संबंधित एजन्सी आणि अधिकारी प्रामाणिकपणो काम करतात, असे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. बाविस्कर यांनी सांगितले.