बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवणारा गजाआड; गोरेगाव पोलिसांची कारवाई

By गौरी टेंबकर | Published: December 6, 2022 12:02 AM2022-12-06T00:02:13+5:302022-12-06T00:03:38+5:30

गोरेगाव पोलिसांनी सोमवारी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड केंद्राचा पर्दाफाश करत एकाला अटक केली आहे.

one arrest for fake aadhaar card pan card mumbai goregaon police action | बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवणारा गजाआड; गोरेगाव पोलिसांची कारवाई

बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवणारा गजाआड; गोरेगाव पोलिसांची कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई:  गोरेगाव पोलिसांनी सोमवारी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड केंद्राचा पर्दाफाश करत एकाला अटक केली आहे. आरुगेशकुमार मिश्रा (४२) असे आरोपीचे नाव आहे. या त्याच्याकडून सुमारे ३० आधारकार्ड आणि ७ पॅनकार्डेही जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा गोरेगाव पश्चिमेकडील प्रेमनगर भागात अनेक वर्षांपासून हे केंद्र चालवत होता. लोकांकडून पैसे उकळून बनावट कागदपत्रे बनवण्यात त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त  अजय कुमार बन्सल आणि वरिष्ठ निरीक्षक दत्तात्री थोपटे यांच्या देखरेखीखाली एक टीम तयार करण्यात आली. 

पोलीस उपनिरीक्षक यांच्या राम वैष्णव यांनी त्यांच्या टीमसह रविवारी या केंद्रावर छापा टाकला. एका डमी ग्राहकाला पॅन बनवण्यासाठी पाठवण्यात आले तेव्हा कार्डसाठी आरोपीने १ हजार रुपये घेतले आणि त्याचा फॉर्म भरला. त्यानंतर दहा दिवसांनी दुकानातून कार्ड घेण्यास सांगितले  केंद्रावर छापा टाकला आणि झडतीदरम्यान पोलिसांनी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त केले.  अधिकार्‍यांनी जप्त केलेल्या आधारकार्डांसह नोंदवलेल्या क्रमांकांवर कॉल केला असता, बहुतेक क्रमांक बनावट असल्याचे आढळून आले, असे अधिकारी पुढे म्हणाले." मिश्रावर कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ व ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करून  अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले गेल्यावर  पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

पोलिसाना संशय आहे की ऑनलाइन फसवणूक करणारे, बँक खाती उघडण्यासाठी याचा वापर करतात ज्याचा वापर फसव्या व्यवहारातून पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जातो, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आरोपी मिश्रा याचा अशा कोणत्या टोळीशी संबंध आहे का, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही पॅनकार्ड विभागाला पत्र लिहून मिश्राच्या घराच्या पत्त्यावर केंद्रावर पाठवण्याऐवजी एवढ्या मोठ्या प्रमाणात पॅनकार्ड कसे पाठवले याची माहिती मागवली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: one arrest for fake aadhaar card pan card mumbai goregaon police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.