मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 कोटींच्या रोकडसह एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 11:34 AM2018-07-05T11:34:10+5:302018-07-05T11:34:34+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिका-यांनी मोठी कारवाई केली आहे.
Next
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिका-यांनी मोठी कारवाई केली आहे. जेट एअरवेजच्या विमानानं पैसे घेऊन जाणा-या एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. भूपेंद्र सिंह या व्यक्ती दुबईत जात असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. 1 लाख 48 हजार 500 अमेरिकन डॉलर म्हणजे 1 कोटी 2 लाख 4 हजार 177 रुपयांची रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. कार्डबोर्ड रोलमध्ये गुंडाळून तो पैसे नेत असल्याचं समोर आलं आहे.
Air Intelligence Unit officers at #Mumbai's Chhatrapati Shivaji International Airport arrest a passenger for possession of US$ 1,48,500 concealed inside a cardboard roll he was carrying. pic.twitter.com/UuQe1YV1xR
— ANI (@ANI) July 5, 2018