८२ लाखांच्या फसवणुकीत एकाला अटक
By admin | Published: June 23, 2014 01:56 AM2014-06-23T01:56:58+5:302014-06-23T01:56:58+5:30
विक्री करण्याच्या बहाण्याने ८२ लाखांचे हिरे घेऊन पोबारा करणाऱ्या आरोपीला डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली. प्रशांत गुप्ता असे या आरोपीचे नाव असून, तो कानपूरचा रहिवासी आहे.
Next
मुंबई : विक्री करण्याच्या बहाण्याने ८२ लाखांचे हिरे घेऊन पोबारा करणाऱ्या आरोपीला डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली. प्रशांत गुप्ता असे या आरोपीचे नाव असून, तो कानपूरचा रहिवासी आहे.
आॅक्टोबर २०१२ ते सप्टेबर २०१३ दरम्यान आरोपीने व्यापाऱ्याकडून ८२ लाख ७६ हजारांचे हिरे विक्रीसाठी घेतले. मात्र वर्ष उलटल्यानंतरही व्यापाऱ्याला या हिऱ्यांची किंमत अथवा हिरे परत आणून दिले नाहीत. व्यापाऱ्याने आरोपीकडे हिरे परत देण्यासाठी तगादा लावला. आरोपीने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तक्रार केली. (प्रतिनिधी)