Join us

प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या एकाला अटक; मुंबईत कारवाई

By मनीषा म्हात्रे | Published: March 11, 2024 1:51 PM

प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबई - सोशल मिडीयाव्दारे Pakistan based intelligence operative (PIO) यांना प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिल्याने संशयित इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. एक भारतीय संशयित इसम हा Pakistan based intelligence operative (PIO) यांच्या संपर्कामध्ये असून त्याने भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवली आहे अशी गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिटला प्राप्त झाली होती. 

त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाकडून नमुद संशयित इसमाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान असे दिसून आले की, सदर संशयित इसमाची नोव्हेंबर २०२१ ते मे २०२३ याकालावधीत फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे एका Pakistan based intelligence operative (PIO) शी ओळख झाली होती. सदर संशयित इसमाने नमुद PIO शी फेसबुक व्हॉट्सअप अकाऊंटवर चॅटींग करून त्यास भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर प्रकरणी संशयित इसम व संपर्कातील PIO यांच्या विरुध्द दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात संशयित इसमास अटक करण्यात आली असून नवी मुंबई युनिट, दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.