साकीनाका पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देवनारमधील एकाला सहा माेटरसायकल चाेरल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी अटक केली. दोन वर्षांनंतर तो पोलिसांच्या तावडीत सापडला असून त्याच्यावर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकाने दुसरी नोकरी शोधण्यास सांगितल्याच्या रागातून त्याने हा प्रकार केला.
मिरज खान असे अटक आरोपीचे नाव आहे. नोकरी गमावण्याच्या भीतीतून त्याने दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९मध्ये त्याच्या मालकाचीच मोटरसायकल पळवली. गारमेंट कंपनीत काम करणाऱ्या खानला त्याच्या मालकाने पगार देण्याबाबत असमर्थता दर्शवत दुसरी नोकरी शोधण्यास सांगितले. याचा त्याला राग आला होता. त्यानंतर अशाच जवळपास सहा दुचाकी ज्यात एका स्कुटीचादेखील समावेश आहे त्याने चोरल्या. चोरीच्या गाड्या या घाटकोपर, साकीनाका आणि एमआयडीसी परिसरातील आहेत. या सर्व गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्यासाठी जवळपास ३५ ते ४० सीसीटीव्ही कॅमेरे तपास अधिकाऱ्यांनी पडताळले.
.......................