मुंबई: पडून राहिलेली किंवा ज्या घरांना प्रतिसाद मिळत नाही, अशी घरे विकण्यासाठी म्हाडा उपाय करत असून, आता विरार-बोळींजमधील घरे विकण्यासाठी आधार व पॅनकार्डची नोंदणी करून आपल्या स्वप्नातील घर खरेदी करा, अशा आशयाचे आवाहन म्हाडाने समाज माध्यमांवर केले आहे.
म्हाडाने येथील सर्व इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त असल्याची माहिती दिली. येथील वन बीएचके घराची किंमत २३ लाख २८ हजार ५६६ तर टू बीएचके घराची किंमत ४१ लाख ८१ हजार ८३४ रुपये आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य योजनेतंर्गत सर्व तयार घरांचे लॉटरीशिवाय वितरण होईल. रक्कम पुर्ण भरल्यास दोन आठवड्यांत घरांचा ताबा दिला जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ पॅन आणि आधार कार्डद्वारे पात्रता निश्चिती केली जाईल, असे म्हाडाने म्हटले आहे.
विरार-बोळींज येथील घरांना सुर्या धरणातून पाणीपुरवठा होत आहे, असे म्हाडाने म्हटले असून, अधिक माहितीसाठी वांद्रे येथील म्हाडाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
- सुमारे ५ हजार घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री करण्यात येत आहेत.- योजनेसाठी सवलती घर खरेदीदारांसाठी जाहीर केल्या आहेत.- यापूर्वी घर खरेदीदाराने घराची रक्कम भरल्यानंतर घराचा ताबा मिळण्यास सुमारे तीन महिने कालावधी लागत होता.