उपनगरात वन-बीएचके मिळणार ७५ लाखांपुढे; १२ महिन्यांत दीड लाखाहून अधिक खरेदी-विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:18 AM2024-01-11T10:18:37+5:302024-01-11T10:18:58+5:30

अनेकांचे स्वप्न झाले पूर्ण. 

One BHK will be available in the suburbs for 75 lakhs over 1.5 Lakhs traded in 12 months | उपनगरात वन-बीएचके मिळणार ७५ लाखांपुढे; १२ महिन्यांत दीड लाखाहून अधिक खरेदी-विक्री

उपनगरात वन-बीएचके मिळणार ७५ लाखांपुढे; १२ महिन्यांत दीड लाखाहून अधिक खरेदी-विक्री

मुंबई : नुकत्याच सरलेल्या २०२३ च्या वर्षात मुंबई शहर, उपनगरे आणि महामुंबईत मिळून दीड लाखापेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थचक्र रुळांवर आले आहे. एकीकडे किमती वाढल्या तरी घरांच्या खरेदीतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, आजवर वन-बीएचके घराला मुंबईकरांनी कायमच पसंती दिली आहे.   त्या घरांच्या किमतीदेखील ७५ लाख रुपयांच्या पलीकडे गेल्या आहेत.

मुंबई शहर व उपनगरांमध्ये भूखंडांचे प्रमाण मर्यादित आहे आणि मागणी जास्त आहे. याचा थेट परिणाम किंमतवाढीच्या रूपाने दिसून येत आहे. दुसरीकडे, मुंबई शहर व उपनगरांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे सेवा-सुविधांतदेखील वाढ होत आहे. यामुळे घरांच्या किमतींत वाढ होत आहे. 

व्यावसायिक मालमत्ता की घरांची खरेदी ?

 तसेच शहर व उपनगरांत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. 

 मूळ रहिवाशांना घरे दिल्यानंतर बांधण्यात येणाऱ्या सेल घरांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत.  

घरखरेदीचा ट्रेंड बदलताेय का?

 सन २०२३ मध्ये घरखरेदीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहे. ज्या लोकांची वन-रूमची घरे होती, त्यांनी अधिक मोठे घर घेण्याच्या दृष्टीने वन-बीएचके घरांची खरेदी केली. मात्र, तूर्तास मुंबईमध्ये वन-बीएचके घरांच्या नव्या निर्मितीचे प्रमाण घटले आहे.

 विकासक प्रामुख्याने टू-बीएच-के किंवा त्यापेक्षा अधिक मोठी घरे बांधत आहेत. २०२३ च्या वर्षात मुंबई व उपनगरांत ज्या घरांची विक्री झाली त्यामध्ये २० टक्क्यांपर्यंत घरांच्या विक्रीचे प्रमाण हे २ बीएचके घरांचे आहे. 

अमिताभ बच्चन, अजय देवगण, काजोल, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक मालमत्तांची खरेदी केली आहे. व्यावसायिक मालमत्तांमध्ये झालेल्या एकूण उलाढालीमध्ये बॉलिवूड कलाकारांचा वाटा हा १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

शहर व उपनगरांत ज्या मालमत्तांची विक्री झाली, त्यात निवासी मालमत्ता व व्यावसायिक मालमत्ता अशा दोघांचे प्रमाण अनुक्रमे ८० व २० टक्के आहे. ज्या व्यावसायिक मालमत्तांची विक्री  झाली, त्यांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाटा हा बाॅलिवूडकरांचा 
आहे. 

 ज्यांच्या किमती उपनगरांत ७५ लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत गेल्या आहेत, तर मुंबई शहरात याच किमती ८० लाख ते पावणेदोन कोटी रुपयांपर्यंत आहेत.

Web Title: One BHK will be available in the suburbs for 75 lakhs over 1.5 Lakhs traded in 12 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.