निवडणुकीविषयी माहिती एका क्लिकवर

By admin | Published: March 21, 2015 12:54 AM2015-03-21T00:54:09+5:302015-03-21T00:54:09+5:30

महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती नागरिकांना तत्काळ मिळावी यासाठी प्रशासनाने पालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत केले आहे.

One click on information about elections | निवडणुकीविषयी माहिती एका क्लिकवर

निवडणुकीविषयी माहिती एका क्लिकवर

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती नागरिकांना तत्काळ मिळावी यासाठी प्रशासनाने पालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत केले आहे.प्रभाग रचना, मतदार याद्या व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क नंबर यासारखी निवडणुकीविषयीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून मतदारांना गैरप्रकाराची माहिती संबधित अधिकाऱ्यांना देण्यास मदत होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. प्रभाग आरक्षण व प्रभाग रचना जाहीर झाली आहे. प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु प्रभाग रचना व मतदार याद्यांची माहिती नागरिकांना महापालिकेच्या विभाग कार्यालयात उपलब्ध होत नव्हती. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे महापालिका प्रशासनाने स्वत:च्या संकेतस्थळावर निवडणुकीविषयी सर्व तपशील अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहिती एका क्लिकमध्ये घरबसल्या पाहता येतील. प्रारूप प्रभाग रचना, अंतिम प्रभाग रचना, प्रभागाची रचना कशी असणार, लोकसंख्या किती यांचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदार व उमेदवारांनी कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे, याविषयी सर्व माहिती या संकेतस्थळावर आहे.
सर्व १११ प्रभागांच्या मतदार याद्या ६६६.ल्लेूङ्मल्ल’्रल्ली.ूङ्मे या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. एसएमएसद्वारे मतदार यादीतील नावाची माहिती मिळणार आहे. मतदार यादीमध्ये नाव कसे शोधायचे याचा तपशीलही देण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१५ नावाचे (ल्लेूी’ीू३्रङ्मल्ल.ङ्म१ॅ) स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे. याशिवाय राज्य व भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाची माहितीही देण्यात आली आहे. या संकेतस्थळावरून निवडणुकीविषयी शासनाचे सर्व अध्यादेश व इतर माहिती पाहता येतील. निवडणुकीविषयी रोजचा तपशील यावर उपलब्ध होणार आहे. राज्य निवडणूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची नावे व कार्यालयातील संपर्क नंबर देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

संकेतस्थळावरील उपलब्ध माहिती
च्प्रारूप व अंतिम प्रभाग आराखडा
च्प्रभागनिहाय मतदार याद्या
च्मतदार व उमेदवारांना सूचना
च्निवडणूक अधिकाऱ्यांचा संपर्क नंबर
च्राज्य व भारतीय निवडणूक विभागाच्या संकेतस्थळाची माहिती
च्एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव शोधण्याची माहिती
च्मतदार यादीतून व्यक्तिगत नावे शोधण्याचा पर्याय

च्ज्या मतदारांची नावे २०१४ च्या मतदार यादीमध्ये होती, परंतु २०१५ च्या मतदार यादीमध्ये नावे नसतील तर अशा मतदारांनी २३ मार्चपर्यंत महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे सूचना व हरकती पाठवाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे. हरकती लेखी स्वरूपात नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: One click on information about elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.