Join us

एका क्लिकवर समजणार दूध शुद्ध की संसर्गजन्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 1:43 AM

मसटाइटीस हा एक विशेष रोग प्राण्यांमध्ये आढळतो. जो जीवाणूमुळे होतो़ गायींच्या त्वचेवर हा जीवाणू आढळल्याने दूध दूषित होते.

मुंबई : दूध शुद्ध आहे की नाही, हे आता एका क्लिकवर ओळखता येणार आहे. एका कंपनीने ‘मूफार्म अ‍ॅप’ तयार केला आहे. ‘मूफार्म अ‍ॅप’वर दुधाच्या पिशवीवरील बारकोडचा फोटो अपलोड करून दूध दूषित आहे की नाही, याविषयी माहिती उपलब्ध होईल. नुकतेच मूफार्म या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.

मूफार्मचे सहसंस्थापक अशना सिंगनी सांगितले की, मसटाइटीस हा एक विशेष रोग प्राण्यांमध्ये आढळतो. जो जीवाणूमुळे होतो़ गायींच्या त्वचेवर हा जीवाणू आढळल्याने दूध दूषित होते. स्तनदाह झाल्यामुळे दूध दूषितच नाही, तर उत्पादनही कमी होते. मुफार्मच्या संशोधनानुसार, मसटाइटीस झाल्यामुळे दूध उद्योगाला दरवर्षी ५०० दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले. 

एखाद्या शेतकऱ्याला गाय किंवा म्हशींच्या स्तनदाह असल्यास ते पाच हजार रुपये प्रति महिना नुकसान होऊ शकते. याचा प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही शुद्ध दूध आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचविता येणार असून, या अ‍ॅपमुळे शेतकºयांच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होणार आहे, असेही अशना सिंग यांनी सांगितले़

टॅग्स :दूध