राज्यात एक कोटींची रोकड जप्त

By Admin | Published: October 14, 2014 01:23 AM2014-10-14T01:23:10+5:302014-10-14T01:23:10+5:30

रायगड जिलतील खालापूर टोलनाक्यावर एसटीमधून 4क् लाख, तर गोंदिया बसस्थानकावर 53 लाख आणि यवतमाळ जिलत 13 लाख 15 हजार रुपये जप्त करण्यात आल़े

One crore cash seized in the state | राज्यात एक कोटींची रोकड जप्त

राज्यात एक कोटींची रोकड जप्त

googlenewsNext
मुंबई : निवडणूक भरारी पथकांनी सोमवारी केलेल्या तपासणीमध्ये रायगड जिलतील खालापूर टोलनाक्यावर एसटीमधून 4क् लाख, तर गोंदिया बसस्थानकावर 53 लाख आणि यवतमाळ जिलत 13 लाख 15 हजार रुपये जप्त करण्यात आल़े 
रायगड जिलतील खालापूर टोल नाक्यावर मुंबईहून कोल्हापूरकडे जाणा:या एसटीतून पकडण्यात आलेले पैसे सांगली जिल्ह्यात निवडणुकीसाठी हे पैसे नेले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सांगलीच्या मांगले तालुक्यातील शिराळा येथील रहिवासी कृष्ण सरफले आणि सतीश पाटील यांच्या बॅगांमध्ये तब्बल 4क् लाखांची रोकड मिळाली. हे पैसे सांगलीतील कोणत्या राजकीय पुढा:याचे आहेत, याचा उलगडा संध्याकाळर्पयत झाला नव्हता.  
गोंदिया जिलतील कु:हाडी बसस्थानक परिसरात तपासणीदरम्यान इंडिका कारमधून 53 लाख रूपयांची रोकड मिळून आली. या गाडीसोबत संजय सुरजलाल नंदनवार (22), विशाल गोविंद कुव्रे (32), पंकज बांगरे (26) आणि रवी पारधी (21) हे चार तरूण होते. या तरूणांनी गोरेगाव येथील एटीएम मशीन टाकण्यासाठी सदर रक्कम आणल्याचे सांगितले. पथकाने पकडलेली रोकड गोरेगाव पोलीस ठाण्यात जमा केली आह़े तसेच यवतमाळ जिलच्या दिग्रस आणि पुसद येथे वाहनांच्या तपासणीदरम्यान सोमवारी 13 लाख 15 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पुसद-दिग्रस मार्गावर घाटोडीनजीक भरारी पथकाला एका ओमनी कारवर (एम.एच.14-डीएम-8223) संशय आला. म्हणून या पथकाने सदर कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला. कार थांबवून तपासणी केली असता त्यात आठ लाख रुपये सापडले. ही रक्कम बँक ऑफ इंडियाच्या एटीएमची असल्याचे चालकाने सांगितले. दरम्यान, दिग्रसच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयातून निवडणूक भरारी पथकाने रोख रकमेसह हे साहित्य जप्त केले. पाकिटे फोडल्यानंतर त्यामध्ये एकूण 1 लाख 65 हजार रुपये सापडले. पथकाने प्रचार कार्यालय गाठताच तेथे उपस्थित असलेल्या कार्यकत्र्यानी पळ काढला. त्यामुळे केवळ हे साहित्य जप्त केले. त्यात प्रत्येकी एक हजार आणि दीड हजाराची रोकड असलेली 11क् पाकिटे आढळून आली. त्यासोबत बिल्ले, डमी मतपत्रिकादेखील सापडल्या.  याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आह़े  (प्रतिनिधी)
 
पैसे कोणत्या पुढा:याचे, 
हे गुलदस्त्यात
च्कृष्ण सरफले आणि सतीश पाटील यांच्या बॅगांमध्ये ही रक्कम आढळली असून, ते सांगली जिल्ह्यातील मांगले तालुक्यातील शिराळा 
येथील रहिवासी आहेत. 
च्हे पैसे सांगलीतील कोणत्या राजकीय पुढा:याचे आहेत, याचा उलगडा संध्याकाळर्पयत होऊ शकला नव्हता. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती खालापूरचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली.
 
सोलापूरमध्ये
6 लाख जप्त
सोलापूरमधील हॉटेल प्रथममध्ये 103 क्रमांकाच्या रूममध्ये निवडणूक अधिका:यांनी टाकलेल्या छाप्यात 6 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी हैदराबाद येथील काँग्रेसचे कार्यकर्ते प्रेमलाल लोढा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रेमलाल लोढा आठ दिवसांपासून हॉटेल प्रथम येथे वास्तव्यास होते. लोढा व काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार सिद्धेश्वर मंदिरात दर्शनाला गेले. तेव्हा भरारी पथकानी रूमची तपासणी केली.
या तपासणीत 1 हजारच्या नोटांचे गठ्ठे असलेली 6 लाखांची रोख रक्कम आढळली. प्रकाश यलगुलवार व प्रेमलाल लोढा यांच्याकडे चौकशी केली असता यलगुलवार यांनी हा पैसा पक्षाने दिलेल्या निधीतील असल्याचे सांगितले. पथकाने लोढा यांना ताब्यात घेतले.
पक्षाने हा पैसा निवडणूक खर्चासाठी निधी स्वरूपात पाठविला आहे. मी पक्षाचा शहराध्यक्ष असल्याने माङयाकडे नियमानुसार 10 लाख रूपये निवडणूक खर्चासाठी बाळगण्याची परवानगी आहे. याबाबत बँकेचे  विवरण पत्र माङयाकडे आहे, असे यलगुलवार यांनी सांगितले. 
 

 

Web Title: One crore cash seized in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.