डोंगरीत तरुणीकडून एक कोटीचे एमडी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:47+5:302020-12-13T04:24:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई पोलीस दलातील अमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) एका २५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलीस दलातील अमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) एका २५ वर्षांच्या तरुणीला अटक करून एक किलो ४५ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. तिच्याकडे आठ लाख ७८ हजार ५०० रुपयांची रोकडही सापडली.
सनम तारिका सय्यद असे तिचे नाव आहे. तिच्याकडून जप्त केलेल्या पावडरची अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय बाजारात १.१० कोटी किंमत असल्याचे सांगण्यात आले.
एएनसीच्या वांद्रे कक्षातील हवालदार पाटील यांना एक तरुणी डोंगरी परिसरात एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, येथील शहीद मार्ग परिसरात त्यांनी सापळा रचला होता. तिला पकडून झडती घेतली असता, ६० ग्रॅम एमडी पावडर तर तिच्या घराची झडती घेतली असता, रोकड आणि १.३५ किलो एमडी पावडर सापडली. सहायक आयुक्त राजेंद्र चिखले, निरीक्षक अनिल वाधने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
.....................