मुंबईकरांना एक कोटी लसमात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:08 AM2021-09-06T04:08:03+5:302021-09-06T04:08:03+5:30
मुंबई : मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा गेले दीड वर्षे प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक ...
मुंबई : मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा गेले दीड वर्षे प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. गेल्या साडेआठ महिन्यांत मुंबईने एक कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारीपर्यंत १ कोटी २ लाख ३९ हजार ८६५ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत ५८ लाख १७ हजार २८१ पुरुषांना, तर ४४ लाख २० हजार २२६ महिलांना लस देण्यात आली आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारच्या कोव्हिन ऍपवरील नोंदी प्रमाणे ४ सप्टेंबरला महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारची ३३३७, तर खासगी २०२ अशी एकूण ५४९ केंद्रांवर १ लाख ७८ हजार ८७९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यामुळे मुंबईने साडेआठ महिन्यात एक कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. आजपर्यंत एकूण १ कोटी २ लाख ३९ हजार ८६५ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यात ७३ लाख ६ हजार ६४८ लाभार्थ्यांना पहिला, तर २९ लाख ३३ हजार २१७ लाभार्थ्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
पुरुषांची संख्या अधिक
१ कोटी २ लाख ३९ हजार ८६५ लाभार्थ्यांपैकी ५८ लाख १७ हजार २८१ पुरुषांना, तर ४४ लाख २० हजार २२६ महिलांना लस देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयातील ५२ लाख ५७ हजार ५४१, ४५ ते ६० वर्षामधील ३० लाख ४५ हजार ६८८ तर ६० वर्षांवरील १९ लाख ३६ हजार ६३६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत कोव्हिशिल्डचे ९२ लाख ७९ हजार ९२९, कोवॅक्सिनचे ९ लाख २६ हजार २४८, तर स्फुटनिक व्हीचे ३३ हजार ६८८ डोस देण्यात आले आहेत.
सर्वाधिक लसीकरण 'या' दिवशी
कोव्हिन ऍपवरील नोंदी प्रमाणे ४ सप्टेंबर रोजी सर्वाधिक १ लाख ७८ हजार ८७९ लसीचे डोस देण्यात आले. त्याआधी २७ ऑगस्ट रोजी १ लाख ७७ हजार १७, २१ ऑगस्ट रोजी मुंबईत १ लाख ६३ हजार ७७५, १४ ऑगस्टला १ लाख ५३ हजार ३३१, तर २३ ऑगस्ट रोजी १ लाख ५३ हजार ८८१ लसीचे डोस देण्यात आले.
एकूण लसीकरण आकडेवारी
विभाग एकूण लसीकऱण
फ्रंटलाइन/आरोग्य कर्मचारी ७३९२६८
६० वर्षांवरील १८३१६८५
४५ ते ५९ वयोगट २८०७६८९
१८ ते ४४ वयोगट ४३७९६५९
स्तनदा माता ७२२१
गर्भवती १०९७
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी,व्यावसायिक ३३१०
ओळखपत्र नसलेले २९८४
अंथरुणाला खिळलेले ३७३७
कोविशिल्ड ८९४७३१७
कोव्हॅक्सिन ८२४६०८
स्पुतनिक ३१०७०
खासगी केंद्रातील लसीकरण
विभाग लाभार्थी
फ्रंटलाइन/आरोग्य कर्मचारी ५६८११
६० वर्षांवरील ५५३६६४
४५ ते ५९ वयोगट ९४९५६४
१८ ते ४४ वयोगट २७८६५१३
स्तनदा माता ३३४७
गर्भवती ६११
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, व्यावसायिक0
दिव्यांग २२४
एकूण ४३५०७३४