एका दिवसात ११ कोटींचा गल्ला
By Admin | Published: November 16, 2016 06:01 AM2016-11-16T06:01:08+5:302016-11-16T06:01:08+5:30
जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे वाहतूकदारांकडून भरल्या जाणाऱ्या करावरही परिणाम झाला. त्यामुळे केंद्राकडून जुन्या नोंटा
मुंबई : जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे वाहतूकदारांकडून भरल्या जाणाऱ्या करावरही परिणाम झाला. त्यामुळे केंद्राकडून जुन्या नोंटा काही विभागांना घेण्याची याआधी १४ नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. त्यामुळे परिवहन विभागाने वाहतूकदारांना विविध कर भरता यावा यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरु ठेवली. त्याचा फायदाच परिवहनला मिळाला.
जवळपास ११ कोटीं ३0 लाख ५५ हजार रुपये एवढा महसुल प्राप्त झाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. थकीत तसेच चालू कालावधीचा कर भरणा ५00 आणि १000 रुपयांच्या चलनातील जुन्या नोटांव्दारे देखील केला जावू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी कर भरण्यासाठी गर्दीच केली. यात ठाणे आरटीओत सर्वाधिक म्हणजेच १ कोटी ९३ लाख ४६ हजार महसुल जमा झाला. (प्रतिनिधी)
त्यानंतर पनवेल आरटीओचा नंबर लागत असून त्यांच्याकडे १ कोटी ८४ लाख तर नांदेड आरटीओकडे १ कोटी १३ लाख महसुल जमा झाल्याचे सांगण्यात आले.