दररोज होते एक हजार २७० टन ऑक्सिजनचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:05 AM2021-05-01T04:05:22+5:302021-05-01T04:05:22+5:30

नोडल अधिकाऱ्यांद्वारे सर्व जिल्ह्यांना वेळेत पुरवठा करण्यासाठी प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहरासह राज्यभरात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा ...

One day 270 tons of oxygen is produced | दररोज होते एक हजार २७० टन ऑक्सिजनचे उत्पादन

दररोज होते एक हजार २७० टन ऑक्सिजनचे उत्पादन

Next

नोडल अधिकाऱ्यांद्वारे सर्व जिल्ह्यांना वेळेत पुरवठा करण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहरासह राज्यभरात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये म्हणून राज्यामध्ये आयनॉक्स इंडिया, लिंडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जे.एस.डब्ल्यू या पाच कंपन्या ऑक्सिजनचे उत्पादन करत आहेत. याशिवाय अनेक छोटे उत्पादक असून, त्यांच्या उत्पादनातही वाढ होत आहे. त्यानुसार, या सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे एक हजार २७० टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे.

केंद्र सरकारनेही महाराष्ट्रासाठी एक हजार ७८४ टन ऑक्सिजन कोटा निश्चित केला आहे. यात राज्यासह बाहेरील उत्पादकांचा समावेश आहे. सध्या राज्याला छत्तीसगड, कर्नाटक, गुजरातमधून साधारणत: २०० ते २५० टन ऑक्सिजन रोज मिळत आहे. शिवाय नायट्रोजनसाठी असलेल्या टँकरचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर करणे सुरू आहे. त्यानुसार, ६८० टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे. ३५० ते ४०० टन वाहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे विवरण पत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देण्यात येते. आजवर एक हजार ६३६ टनाचे विवरणपत्र देण्यात आले आहे. ऑक्सिजन वितरणासाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांद्वारे सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

* भिवंडी, पुणे, नागपूरमधून हाेताे रेमडेसिविरचा पुरवठा

भिवंडी, पुणे आणि नागपूर येथील डेपोमधून रेमडेसिविरचा पुरवठा केला जातो. चार लाख ३५ हजार रेमडेसिविरचा साठा २१ ते ३० एप्रिल या कालावधीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, २१ ते २८ एप्रिलअखेरपर्यंत दोन लाख ९८ हजार २४ इतका साठा खासगी व शासकीय रुग्णालयांना करण्यात आला आहे.

..............................

Web Title: One day 270 tons of oxygen is produced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.