Join us

एक दिवसाचा डबेवाला, रोहित पवारांचा चर्चगेट ते दादर 'लोकल' प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 8:34 PM

मुंबईकरांना जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा

मुंबई- मायानगरीच्या मुंबईतील डबेवाल्यांचं कौतुक कोण करत नाही. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही मुंबईतील बडेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकलने प्रवास केला. विशेष म्हणजे, मी एक दिवस त्यांच्यातला डबेवाला बनल्याचं रोहित यांनी सांगितलं. रोहित यांनी डबेवाल्यांसोबतच्या एक दिवसाचा अनुभव शेअर केला आहे.  

मुंबईकरांना जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा डबेवाला त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे साता-समुद्रापार पोहोचला आहे. त्यातूनच डबेवाल्यांकडून समाजाभिमूख कार्यातही सहभाग नोंदविण्यात येत आहे. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात डबेवाल्यांनी सहभाग नोंदवला होता. तर अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनातही त्यांनी आपला पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला होता. तर, केरळच्या मदतीसाठी डबेवाला पुढे आला आहे. त्यामुळे मुंबईचा डबेवाला आता सर्वांनाच आपलासा वाटतो. रोहित पवार यांनीही डबेवाल्यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

मुंबईतील डबेवाल्यांच्या स्कीलची भुरळ इंग्लंडच्या युवराजालाही पडली होती. तसंच माझं कॉलेजचं शिक्षणही मुंबईत झाल्यामुळे मलाही या डबेवाल्यांच्या कामाबाबत खूप दिवसांपासून आकर्षण आहे. मुंबईकर चाकरमान्यांना गरमागरम घरचं जेवण ऑफिसमध्ये मिळतं पण त्यामागे डबेवाल्यांचे किती कष्ट असतात आणि त्यासाठी जगातला कोणताही मॅनेजमेंटचा कोर्स न करताही हे लोक कसे डबे पोचवतात हे जाणून घेण्यासाठी मी मुंबईत डबेवाल्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चगेट ते दादर असा लोकल प्रवास करुन प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत एक दिवस मीही त्यांच्यातलाच एक डबेवाला होऊन गेलो, असे रोहित यांनी म्हटले.  

मुंबईसारख्या मेट्रो शहरात हे काम सर्व मराठी माणसं करतात महत्त्वांचं असल्याचं रोहित यांनी म्हटलं. तसेच, डबेवाल्यांच्या दादर येथील ऑफिसला भेट देत डबेवाल्यांची ओळख असलेली मराठमोळी टोपी घालून त्यांच्याकडून सन्मानही स्विकारला. यावेळी त्यांनी एका कामासंदर्भात अजित पवारांना भेटण्याची इच्छा डबेवाल्यांनी बोलून दाखवली. त्यानुसार रोहित यांनी अजित पवारांची भेटही घडवून आणली. 

टॅग्स :मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसरोहित पवार