Join us

माटुंगा येथील बस अपघातात एकाचा मृत्यू

By admin | Published: May 22, 2017 3:51 AM

बोरीवलीहून रत्नागिरीकडे जाणारी खासगी बस माटुंगा येथे उलटल्याची घटना रविवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ३४ जण जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरीवलीहून रत्नागिरीकडे जाणारी खासगी बस माटुंगा येथे उलटल्याची घटना रविवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ३४ जण जखमी झाले, तर रामकृष्ण नाडर (३८) या प्रवाशाचा दुर्घटनेत मृत्यू झाला. सायन रुग्णालयात या अपघातील २७ जखमींना दाखल करण्यात आले. त्यापैकी २४ जखमींवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. संतोष कापकुले, मुथ्थू रामकृष्ण आणि वणिता वझे अशी त्यांची नावे आहेत, तर केईएम रुग्णालयात आठ जखमींना दाखल करण्यात आले. त्यापैकी सात जणांवर उपचार करत, त्यांना डिस्चार्ज दिला. एका जखमीवर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे वाहतूककोंडी झाली होती.