मुंबईतील वांद्र्यात इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:17 AM2021-06-07T07:17:41+5:302021-06-07T07:19:32+5:30
पाऊस सुरू असल्यानं अग्निशमन दलाकडून सुरू असलेल्या बचावकार्यात अडथळे
मुंबई: वांद्र्यात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. रात्र दीडच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस अधिकारी मदतीसाठी पोहोचले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्थानिक आमदार झीशान सिद्दीकी यांनीदेखील घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात लक्ष घातलं.
#UPDATE | A total of 17 persons were rescued after a wall of a house collapsed on another house in Kherwadi Road area, Bandra East at 1.45 am. At least five persons have sustained injuries in the incident: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)#Maharashtra
— ANI (@ANI) June 7, 2021
मुंबईत पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं आहे का याचा शोध अग्निशमन दलाचे कर्मचारी घेत आहेत. खेरवाडी परिसरात असलेल्या चार मजली इमारतीचा काही भाग मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला. तो काही घरांवर कोसळल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला. आतापर्यंत १७ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली असून पाच जण जखमी झाले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली.