पाचपैकी एक फास्टॅग व्यवहार सदोष, ट्रकमालकांमध्ये गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:07 AM2021-03-09T04:07:30+5:302021-03-09T04:07:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : १५ फेब्रुवारीपासून फास्टॅग सक्ती करण्यात आली आहे. मात्र, स्कॅन होत नसल्याने वाहनचालकांना अडचणी येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १५ फेब्रुवारीपासून फास्टॅग सक्ती करण्यात आली आहे. मात्र, स्कॅन होत नसल्याने वाहनचालकांना अडचणी येत आहेत. वाहन आणि ट्रकमालकांमध्ये फास्टॅगबाबत अजूनही गोंधळ आहे. ट्रकमालकांना भेडसावणाऱ्या सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे टोल प्लाझांवर अतिरिक्त शुल्क वसूल केले जाते. जवळपास पाचपैकी एक फास्टॅग व्यवहार दोषपूर्ण असल्याचे व्हील्सआयच्या अहवालातून समोर आले.
पाच लाखांपेक्षा जास्त वाहनमालकांच्या केलेल्या अभ्यासानुसार, वाहनचालकाला फास्टॅग हाताळण्यात अनेक अडचणी येत आहेत. अतिरिक्त टोल वसुली, रिचार्ज झाल्याचे उशिरा कळणे, टॅगचे अस्पष्ट वर्गीकरण आणि जागरूकता नसणे अशा काही आव्हानांना ट्रकमालकांना वारंवार सामोरे जावे लागत आहे. अनेक केसेसमध्ये फास्टॅग वॉलेटमधून डबल किंवा अतिरिक्त टोल डेबिट केल्याचे दिसून आले.
व्हील्सआयचे सोनेश जैन म्हणाले, ट्रकमालकांना येणाऱ्या अनेक अडचणी पाहताना, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, जागरूकता नसणे व तंत्रज्ञानाचा स्वीकार न करणे ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत.
......................