Join us

प्रत्येकी पाचवी व्यक्ती बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:06 AM

प्रत्येकी पाचवी व्यक्ती बेरोजगारलॉकडाऊनच्या सुरुवातीला असंघटित क्षेत्रावर गदा आली. नंतर संघटित क्षेत्रातही रोजगार कपात झाली. स्टार्टअपने ले-ऑफची घोषणा ...

प्रत्येकी पाचवी व्यक्ती बेरोजगार

लॉकडाऊनच्या सुरुवातीला असंघटित क्षेत्रावर गदा आली. नंतर संघटित क्षेत्रातही रोजगार कपात झाली. स्टार्टअपने ले-ऑफची घोषणा केली. मध्यम व मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांनीही कर्मचारी कमी केले. लॉकडाऊन अगोदर नोकरी शोधणाऱ्याची संख्या ३५.४ टक्के होती, ती आता ३६.२ टक्केच्या पुढे गेली. देशातील शहरांमध्ये प्रत्येकी पाचवी व्यक्ती बेरोजगार असून, महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण २०.९ टक्क्यांच्या आसपास आहे.

विशेष

४० ते ५० वयोगटांतील पुरुषांना, महिलांना नोकरी गमवावी लागली.

लॉकडाऊनमुळे देशातील ४१ लाख रोजगार गेले असून, बांधकाम व कृषी क्षेत्राला जोरदार फटका बसला आहे.

श्रमिक, फेरीवाले, रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, रिक्षाचालक, नाश्ता-चहा-कॉफी व अन्य खाद्यपदार्थांचा स्टॉल लावणाऱ्यांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.

------------------------

कोरोनात राज्याचे मोठे आर्थिक नुकसान

राज्यातील बेरोजगारी दर २०.९ टक्के

एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर ५.८ टक्क्यांवरून २०.९ टक्क्यांपर्यंत गेला.

मेमध्ये हा दर सुधारून १५.५ टक्क्यांपर्यंत गेला.

जूनमध्ये हा दर ९.२ टक्के

जुलै महिन्यात ३.९ टक्क्यांपर्यंत खाली घसरला

ऑगस्टमध्ये हा दर ६.२ टक्क्यांपर्यंत होता.

(स्रोत - सेंटर फॉर मॉनिटारिंग इंडियन इकॉनॉमी)