कांदिवली : कांदिवली पश्चिम परिसरात रस्त्यावर राहणा:या एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट महिन्यात बलात्कार झाला होता. या घटनेनंतर अखेर पोलिसांनी एका आरोपीला दहिसर येथून अटक केली आहे. त्याने दारूच्या नशेत कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीला अटक केल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिपत पांढरमिसे यांनी दिली.
कांदिवलीच्या साईबाबानगर येथील महात्मा गांधी मार्गावर पीडित मुलगी आईसोबत राहायची. पीडित मुलगी परिसरातीलच एका डेअरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिच्यावर सुरुवातीला कांदिवली शताब्दी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला पालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवण्यात आले होते. एका इमारतीतून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांचा शोध सुरू होता.
काही संशयितांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले होते. सीसीटीव्ही कॅमे:याचे फुटेज दाखवून पीडित मुलीच्या आईने आरोपीला ओळखले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला दारूचे व्यसन आहे. पीडित मुलीची आई आणि आरोपीची तब्बल दहा वर्षापासून ओळख होती. आरोपी कॅटरिंगचे काम करतो. (प्रतिनिधी)