मानाच्या हंडीनेच केला घात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:36 AM2019-08-25T00:36:41+5:302019-08-25T00:36:48+5:30

लालबागच्या सुनील सावंत यांना गंभीर दुखापत

one govinda seriously injured in lalbag | मानाच्या हंडीनेच केला घात..!

मानाच्या हंडीनेच केला घात..!

Next

स्नेहा मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचत असताना दुसरीकडे मात्र लालबागच्या एका दहीहंडी गोविंदा पथकात मानाची दहीहंडीखालीच गोविंदाला दुखापत झाल्याने उत्सवाला दु:खाची किनार लागली. लालबाग येथील श्री साई देवस्थान गोविंदा पथकाचे ४१ वर्षीय सुनील प्रभाकर सावंत यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्या ंमानेला गंभीर दुखापत झाली आहे. शनिवारी सकाळी पहिल्याच मानाच्या हंडीखाली ही घटना घडल्याने पथकातील गोविंदा रुग्णालयाच्या आवारात चिंताग्रस्त आवारात दिसून आले.


दहीहंडीच्या उत्सवाची सुरुवात सर्वच गोविंदा पथके आपापल्या विभागातील मानाची हंडी, जागेवाल्याची हंडी फोडून करतात. या ठिकाणी थर रचल्यावर दिवसभराच्या उत्सवाची रंगीत तालीम करून अन्य आयोजनांच्या ठिकाणी कूच करतात. मात्र लालबागच्या या मंडळात मानाच्या हंडीखाली सहा थर रचताना ही घटना घडली. या घटनेनंतर पथकातील गोविंदा सायंकाळी उशिरापर्यंत केईएम रुग्णालयाच्या आवारात बसून होते.


दहीहंडी उत्सवाला आर्थिक मंदीची झळ
मुंबई : मुंबई शहर व उपनगरात शनिवारी दहीहंडी उत्सव शांततेत साजरा झाला. परंतु यंदा दहीहंडी उत्सवाला आर्थिक मंदीची झळ लागल्यामुळे हवा तसा प्रतिसाद दहीहंडी आयोजकांनी दिला नाही. काही दहीहंडी पथकांनी या वेळी नाराजी व्यक्त केली.


२६ गोविंदा रुग्णालयात दाखल
न्यायालयाच्या निर्बंधानंतरही यंदाच्या दहीहंडी उत्सवात बालगोविंदांचा सहभाग दिसून आला. शनिवारी शहर-उपनगरांतील दहीहंडी उत्सवात ११९ गोविंदा जखमी झाले. रात्री नऊ वाजेपर्यंत पालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडून आलेल्या माहितीनुसार, २६ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ९३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.


डोळ्यांवर पट्टी बांधून डॉक्टरांनी फोडली हंडी
सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी थरांवर थर रचून हंडी फोडण्याचा पायंडा मोडत काहीशा वेगळ्या ढंगात हंडी फोडली. रुग्णालयातील वसतिगृहात निवासी डॉक्टरांनी एकत्र येत हा उत्सव साजरा केला. यात निवासी डॉक्टरांनी डोळ्यांवर पट्टी बांधून हंडी फोडली. कोणताही धोका टाळून निवासी डॉक्टरांनी उत्सव साजरा केल्याचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

रुग्णालय दाखल डिस्चार्ज
नायर २ ११
केईएम ६ २१
सायन ७ ५
जे.जे. - १
जसलोक - १
सेंट जॉर्ज - ६
जीटी १ ०
बॉम्बे - १
शताब्दी २ ०
राजावाडी २ १६
अग्रवाल - १
भाभा(वांद्रे) - १२
कूपर १ १०
ट्रॉमा केअर २ ३
व्ही.एन.देसाई - १
शताब्दी
(कांदिवली) २ ४

Web Title: one govinda seriously injured in lalbag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.