एक्स्प्रेस वेवर आजपासून शंभर किमीची वेगमर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:58 AM2019-11-18T02:58:14+5:302019-11-18T02:58:39+5:30

वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यां वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार

One hundred km from today on the expressway | एक्स्प्रेस वेवर आजपासून शंभर किमीची वेगमर्यादा

एक्स्प्रेस वेवर आजपासून शंभर किमीची वेगमर्यादा

Next

मुंबई : वाढते अपघात कमी करण्यासाठी एक्स्प्रेस वेवरवरील वाहनांचा वेग कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे. सध्या या मार्गावर ताशी १२० किमी इतकी वेग मर्यादा आहे. ही वेग मर्यादा रविवारी रात्री १२ वाजल्यापासून ताशी १०० किमी इतकी कमी करण्यात येणार आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यां वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

सोमवारपासून एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या वेगावर नियंत्रण येणार आहे. २५ आॅक्टोबरला नवीन वेग मर्यादेसंदर्भात अधिसूचना काढण्यात काढली आहे. या वेग मर्यादेचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर एक हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी स्पीडोमीटर बसविल्याचे अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयातील अधीक्षक विजय पाटील यांनी स्पष्ट केले.

अशी असेल वेगमर्यादा
अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने निश्चित केलेल्या वेगमर्यादेनुसार एक्स्प्रेस वे वर चालकासह आठ प्रवासी क्षमतेची वाहने यांचा वेग ताशी १०० किमी, नऊपेक्षा अधिक क्षमतेची प्रवासी वाहने ८० किमी, मालवाहू वाहने ८० किमी इतकी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: One hundred km from today on the expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.