Join us

सिलेंडर लिकेज होऊन लागलेल्या आगीत एक जखमी

By admin | Published: October 30, 2016 12:41 AM

घाटकोपरमधील समाजकल्याण केंद्रात असलेल्या फरसाण मार्टमध्ये मिठाई बनविण्याचे काम सुरू असताना आग लागून चंद्रकांत कांबळे (७२) हे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

मुंबई : घाटकोपरमधील समाजकल्याण केंद्रात असलेल्या फरसाण मार्टमध्ये मिठाई बनविण्याचे काम सुरू असताना आग लागून चंद्रकांत कांबळे (७२) हे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेची नोंद करून घाटकोपर पोलिसांनी देवेंद्र ठाकूर याला ताब्यात घेतले आहे.पारशी वाडीतील समाजकल्याण केंद्रात असलेल्या फरसाण मार्टमध्ये दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणात मिठाई बनविण्याचे काम सुरू होती. रात्री दहाच्या सुमारास गॅस गळती होऊन आग लागली. गॅस गळतीमुळे आग लागल्याचे लक्षात येताच एका कामगाराने तो सिलेंडर उचलून समाजकल्याण केंद्राच्या बाहेरील मोकळ्या जागेत फेकला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रहिवाशांनीच एकत्र येत माती आणि पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. मात्र यात कांबळे हे वृद्ध जखमी झाले. घाटकोपर पोलिसांनी कांबळे यांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करून ठाकूरला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)