मुंबईतील वांद्र्यात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू तर १७ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 03:15 AM2022-06-09T03:15:51+5:302022-06-09T06:43:57+5:30
Bandra Building Collapse: या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई : वांद्र्यातील शास्त्रीनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रात्री उशिरा साडे बाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच, ढिगाऱ्याखाली ३-४ जण अडकल्याची भीती वर्तविली जात आहे.
Maharashtra | One person died and 16 people admitted with minor injuries after a G+2 structure collapsed at Shastri Nagar, Bandra West. Rescue operation underway: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/EJwQby3cxm
— ANI (@ANI) June 8, 2022
शास्त्रीनगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ असलेल्या महाराष्ट्र नगरमध्ये ही इमारत होती. तळमजला अधिक दोन मजले असलेल्या या इमारतीचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहे. जखमींना वांद्रे येथील भाभा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. तसेच, ढिगाऱ्याखाली ३-४ जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू आहे.
Maharashtra | The building collapsed around 12.15 am today. One person has died and 16 are hospitalised and are now safe. All of them are labourers from Bihar. Rescue operation is underway. Fire brigade and officers are present at the spot: Manjunath Singe, DCP Mumbai Police pic.twitter.com/UBOyiPQIsI
— ANI (@ANI) June 8, 2022
घटनेबाबत माहिती देताना डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास वांद्रे येथील शास्त्रीनगर भागांत तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून, पहिल्या मजल्यावर ६ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मजल्यावरील १७ जणांना दुखापत झाली आहे. या घटनेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व बिहारमधून आलेले मजूर आहेत.
दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे...
१. खुदास कमीर शेख (वय ५७)
२. मागल्या शेखुद्दीन आलम (वय ४०)
३. फैजान रहमान शेख (वय १९)
४. समिउला महेजुअलम शेख (वय ३९)
५. येशुद्दीन जयलुद्दीन शेख (वय ५०)
६. जरिफुल्ला रेसुद्दीन शेख (वय ३६)
७. जहांगीर सय्यद शेख (वय ४६)
८. झुल्फिकार नसरुद्दीन शेख (वय ३२)
९. फैसान अलियासन शेख (वय ३३)
१०. शहातोराब मुजुरालम शेख (वय ३३)
११. सलीम उस्मान शेख (वय १६)
१२. साबीर रिझौल आलम (वय ४२)
१३. अफकल हलिया शेख (वय ६३)
१४. मनवरलम हसन उल्हार (वय ३३)
१५. नुरेलम अकबर हसिया (वय २२)
१६. ए अहमद मंजीर शेख (वय ६५)
१७. शमी अहमद शेख (वय ४०)
मृत्यू...
१. शाहनवाज आलम (वय ५७)