Join us  

स्कूलबसच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोन जखमी

By admin | Published: February 26, 2016 4:09 AM

शाळेतून घरी परतत असताना तीन भावंडांना स्कूलबसने धडक दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घाटकोपरच्या लक्ष्मीनगर परिसरात घडली. या घटनेत अशोक मुनगर (७) या लहानग्याचा

मुंबई : शाळेतून घरी परतत असताना तीन भावंडांना स्कूलबसने धडक दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घाटकोपरच्या लक्ष्मीनगर परिसरात घडली. या घटनेत अशोक मुनगर (७) या लहानग्याचा जागीच मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या त्याच्या दोन भावंडांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेश (११) आणि लक्ष्मी (१४) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात वास्तव्य करणारी ही तिन्ही मुले पालिकेच्या शाळेत शिकतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती शाळेत आली. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर तिघेही रस्ता ओलांडत असतानाच आर.एन. गांधी स्कूलच्या बसचालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने या तिन्ही भावंडांना धडक दिली. जखमी मुलांपैकी अशोक हा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. दुचाकीवरून विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या भरत रेनकुंट या तरुणाने अशोकला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)संतप्त रहिवाशांचा रास्ता रोकोघाटकोपरमधील या घटनास्थळी महिन्याला एक अपघात होतो. त्यामुळे आजच्या अपघातानंतर संतप्त रहिवाशांनी रास्ता रोको केला. येथे स्कायवॉक किंवा भुयारी मार्ग बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. चार महिन्यांपूर्वी स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनी येथे रास्ता रोको करीत स्कायवॉकची मागणी केली होती. यावर काहीच तोडगा निघाला नाही.