Join us

राज्यात काेराेनाचे एक लाख २२ हजार रुग्ण उपचाराधीन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 7:39 AM

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १० लाख ४२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.७१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १९ हजार १६८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत

ठळक मुद्देमुंबईत बरे झालेल्या काेराेना रुग्णांचे प्रमाण ९६ टक्के असून २० ते २६ जूनपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७२८ दिवसांवर पोहोचला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात काेराेनाच्या ९ हजार ९७४ रुग्णांची नाेंद झाली असून, १४३ मृत्यू झाले. सध्या राज्यात एक लाख २२ हजार २५२ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ८ हजार ५६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५७ लाख ९० हजार ११३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ टक्के झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १० लाख ४२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.७१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १९ हजार १६८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार २४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २ टक्के आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ३६ हजार ८२१ झाली असून, १ लाख २१ हजार २६८ मृत्यूंची संख्या आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १४३ मृत्यूंपैकी ८९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ५४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

मुंबईत काेराेनाचे ९६ टक्के रुग्ण झाले बरे nमुंबईत बरे झालेल्या काेराेना रुग्णांचे प्रमाण ९६ टक्के असून २० ते २६ जूनपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७२८ दिवसांवर पोहोचला आहे. शहर, उपनगरात ८,५८२ रुग्ण उपचाराधीन आहेत.nमुंबईत रविवारी ७४६ रुग्णांचे निदान झाले असून १३ मृत्यूंची नोंद झाली. आता शहर, उपनगरातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २० हजार ३५६ असून मृतांचा एकूण आकडा १५ हजार ३९६ झाला आहे. दिवसभरात कोरोनाच्या ३२ हजार ७११ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ७० लाख ४४ हजार ६५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.nदिवसभरात १,२९५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६ लाख ९४ हजार ८२ रुग्णांनी कोविडवर मात केली. चाळ व झाेपडपट्टीत १२ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८२ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ५ हजार ९९० अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई