राज्यात एक लाख २२ हजार रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:06 AM2021-06-28T04:06:26+5:302021-06-28T04:06:26+5:30

मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात काेराेनाच्या ९ हजार ९७४ रुग्णांची नाेंद झाली असून, १४३ मृत्यू झाले. सध्या राज्यात एक ...

One lakh 22 thousand patients under treatment in the state | राज्यात एक लाख २२ हजार रुग्ण उपचाराधीन

राज्यात एक लाख २२ हजार रुग्ण उपचाराधीन

Next

मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात काेराेनाच्या ९ हजार ९७४ रुग्णांची नाेंद झाली असून, १४३ मृत्यू झाले. सध्या राज्यात एक लाख २२ हजार २५२ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ८ हजार ५६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५७ लाख ९० हजार ११३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ टक्के झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १० लाख ४२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.७१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १९ हजार १६८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार २४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २ टक्के आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ३६ हजार ८२१ झाली असून, १ लाख २१ हजार २६८ मृत्यूंची संख्या आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १४३ मृत्यूंपैकी ८९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ५४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

.........................................................

Web Title: One lakh 22 thousand patients under treatment in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.