Join us

कोरोना बाधित पोलिसाला एक लाखाचे अग्रीम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 7:14 PM

पोलीस महासंचलकाचे आदेश 

  

जमीर काझी 

मुंबई  : कोविड-19 चा पादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र लढताना त्यांचा संसर्ग  झालेल्या पोलीस व त्याच्या कुटूंबीयासाठी एक दिलासादायक बाब आहे. त्यांना  ओषधोपचारासाठी तातडीने एक लाखाची मदत मिळणार आहे.  राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सोमवारी त्याबाबत आदेश दिलेले आहेत.  पोलीस कल्याणनिधीतून ही रक्कम संबधितांना अग्रीम स्वरूपात द्यावयाची आहे. त्यावर काहीही व्याज न आकारता सोयीनुसार त्याची परतफेड घेतली जाणार आहे. 

  देशासह राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन व पोलीस युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. 24 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन कायम आहे. या कालावधीत पोलिसांकडून राज्यभरात नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर  कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गरजूना मदतकार्य करण्यामध्ये पोलीस आघाडीवर आहेत. हे काम करीत असताना अनेक पोलीस अधिकारी, अंमलदाराना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, विशेतः मुंबई, ठाणे जिल्ह्यात त्याचे प्रमाण अधिक आहे.  त्याच्यावर विविध रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संबंधित  पोलीस रहात असलेली इमारत, वसाहत क्वारटाईन करण्यात आलेल्या आहेत. अनेक अधिकारी, अंमलदार यांची तपासणी घेऊन त्यांना होम क्वारटार्ईन करण्यात आलेले आहे. 

 पोलिसांच्यावर कोरोना विषाणूच्या संसर्गाचा  वाढता धोका लक्षात आल्याने पॉझिटिव्ह  अहवाल आलेल्यांना आर्थिक मदतीसाठी त्यांना एक लाख रुपये  अग्रीम देण्याची सूचना सर्व  पोलीस  घटक प्रमुखांना पोलीस महासंचालकानी केली आहे. पोलीस कल्याण निधीतून ही रक्कम द्यायची आहे. 

---------------------------------------

पन्नासवर  जणांना लागण 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या पोलिसाची सोमवारपर्यंत  अधिकृत संख्या 49 आहे.त्यामध्ये 11 अधिकारी आहेत. त्याशिवाय अनेकांच्या चाचणीचा अहवाल अद्याप यावयाचा शिल्लक आहे, त्यामुळे त्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

---------------------------------------

आर्थिक आधार मिळावा 

कोरोनाला थोपविण्यासाठी प्रयत्न करीत असलेले काही अधिकारी, अंमलदार यांना त्याची लागण झाली आहे, त्याच्यावर सर्वोत्परे उपचार केले जात असलेतरी कुटूंबियांना आर्थिक आधार असावा, यासाठी त्यांना बिनव्याजी एक लाख रुपयाचा अग्रीम दिला जात आहे. 

- सुबोध जायसवाल ( पोलीस महासचालक )

  

टॅग्स :पोलिसकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस