Join us

मुंबईत एक लाख लाभार्थी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण बंद करण्यात आले. त्यानंतर या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण बंद करण्यात आले. त्यानंतर या लसींचा वापर करून दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. सध्या राज्यात २० लाख तर मुंबईत १ लाख लाभार्थी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहे. नुकतेच केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोविशिल्ड घेतलेल्या लाभार्थ्यांचा दुसऱ्या डोसचा कालावधी ६-८ आठवड्यांवरून १२-१६ आठवड्यांनंतर कऱण्यात आला आहे, यामुळे लाभार्थ्यांना काही दिलासा मिळाला आहे.

मुंबईत शुक्रवारी २३ हजार ९२४ हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात ११ हजार ३५३ लाभार्थ्यांना पहिला तर १२ हजार ५७१ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण २८ लाख ४१ हजार ३४९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात २१ लाख २१ हजार ५७३ लाभार्थ्यांना पहिला तर ७ लाख १९ हजार ७७६ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण २ लाख ९८ हजार ७६२ आरोग्य कर्मचारी, ३ लाख ५६ हजार ०९८ फ्रंटलाइन वर्कर्स, ११ लाख ३३ हजार ६२८ ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयाेगटातील गंभीर आजार व इतर १० लाख ४ हजार १११, तर १८ ते ४४ वयाेगटातील ४८ हजार ७५० लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

* ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य

मुंबईत रोज ३० हजार ते ५० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून लसींचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसीचा तुटवडा असल्याने लसीचा मुबलक साठा येईपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आणि दुसरा डोस असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे.

* एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी - २,९८,७६२

फ्रंटलाइन वर्कर - ३,५६,०९८

ज्येष्ठ नागरिक - ११,३३,६२८

४५ ते ५९ वय - १०,०४,१११

१८ तर ४४ वय - ४८,७५०

एकूण - २८,४१,३४९

.........................................................