मुंबई : लोकडाउनमुळे उपासमार होत असलेल्या मजूर ,कामगार वर्गाच्या मदतीसाठी नागरी संरक्षण विभागाने (सिव्हिल डिफेन्स) आता हेल्पलाईन सुरु केली आहे. त्यावर सपंर्क साधणाऱ्या गरजुंना आवश्यक ती मदत पोहचवली जात आहे. विविध स्वयसेवी संस्थाच्या मदतीने उभारल्या मदत केंद्राद्वारे रोज सुमारे एक लाख अन्नाच्या पाकिटाचे वितरण करण्यात येत आहे.
सिव्हिल डिफेन्सने +91 22 2284 4171, +91 22 2284 2423 व +91 22 2284 3667 ही दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. ते मुख्य नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहेत. त्यावर संपर्क साधणाऱ्याना ते जेथे असतील तेथे त्यांना आवश्यक ती मदत पोहचविली जाईल, असे महासमादेशक संजय पांड्ये यांनी सांगितले.
दरम्यान, सिव्हिल डिफेन्सकडून वर्सौवा येथील मैदानावर उभारलेल्या निवारा केद्रांत मजूर व गरजू व्यक्तींना आसरा देण्यात आला आहे.याठिकाणी गरजूना अन्नदानासह सर्व प्रकारची मदत दिली जात असून मुंबई महापालिकेचे वैद्यकीय पथक त्यांच्या दिमतीला कार्यरत आहे. विविॆध स्वंयसेवी संस्थाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना वायरसमुळे अभुतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.त्याच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी 30 एप्रिलपर्यत लाँकडाऊन वाढविण्यात आला आहे. या कालावधीत गरजू,कामगार ,गरीब वर्गाना सर्व मदत पोहचवली जाणार असल्याचे महासमादेशक पांण्डये यांनी सांगितले. त्या कामासाठी अमीन पवार यांनी निवारा केद्र बनविण्यासाठी तंबूला लागणार्या सर्व साहित्याचा पुरवठा केला. रिलायन्स फौडेशनच्यावतीने मदत पुरविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नसिम सिद्धीकी ,इस्काँनच्या आदीच्या सहकार्याने मुंबई ,ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड जिल्हातील कष्टकरी वर्गाला मदत पोहचविली जात आहे.