Join us

एक लाख मुंबईकर होम क्वारंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली ...

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी सव्वासहा लाख नागरिक होम क्वारंटाइन होते. मात्र आता रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०८ टक्के आहे. त्यामुळे आता केवळ एक लाख नऊ हजार ९१४ मुंबईकर होम क्वारंटाइन आहेत.

फेब्रुवारीच्या मध्यान्हापासून मुंबईत कोरोनाची दुसरी लाट धडकली. रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने फेब्रुवारी अखेरीस ९६ हजार लोक गृह विलगीकरणात होते. तर सक्रिय रुग्णांची संख्या ९२ हजारांवर पोहोचली होती. ३१ मार्चपर्यंत चार लाख ८७ नागरिक होम क्वारंटाइन होते. तर १० एप्रिल रोजी ही संख्या सहा लाख २७ हजारांवर पोहोचली होती. रुग्ण संख्या वाढत असल्याने २३ एप्रिलपासून मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले.

गेल्या महिनाभरात महापालिकेने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे. आतापर्यंत सात लाख २५ हजार ६२० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सहा लाख ९९ हजार ८२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सात हजार ९०८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ७७ लाख ४६ हजार ४९ नागरिकांनी होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे.

- सध्या ८२३ संशयित रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून, एक लाख ५५ हजार ५७० रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणात कालावधी पूर्ण केला आहे.

- गेल्या २४ तासांमध्ये बाधित रुग्णांच्या संपर्कातील ७,०४५ लोकांचा शोध पालिका कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यापैकी ५,१६० संशयित अति जोखमीच्या गटातील आहेत. तर १,८४६ नागरिक कमी जोखमीच्या गटातील आहेत.