Join us

एक लाख कामगार मंत्रालयावर धडकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 4:06 AM

कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी, एक लाख कामगार एप्रिल महिन्यात मंत्रालयावर धडक देणार आहेत.

मुंबई : कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी, एक लाख कामगार एप्रिल महिन्यात मंत्रालयावर धडक देणार आहेत. या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी सिटू संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी, २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये होणार आहे. या बैठकीला सिटूच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. के. हेमलता मार्गदर्शन करणार असून, राज्यातील ११० राज्य कार्यकारिणी सदस्य या वेळी उपस्थित राहतील.सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होईल. कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार कायद्यासह किमान वेतन म्हणून १८ हजार रुपये, कंत्राटी पद्धत रद्द करून कामगारांना कायम करणे, समान कामाला समान वेतन, योजना कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा, अशा मुद्द्यांवर कार्यकारिणीत चर्चा होईल.