कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी सी-फेसच्या एका मार्गिकेवरील वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 12:38 PM2023-11-06T12:38:31+5:302023-11-06T12:41:40+5:30

कोस्टल रोडच्या पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी-सी फेसवरील एक मार्गिकेची वाहतूक पाच महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

One lane of Worli sea face closed for traffic for coastal road work | कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी सी-फेसच्या एका मार्गिकेवरील वाहतूक बंद

कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी सी-फेसच्या एका मार्गिकेवरील वाहतूक बंद

मुंबई

कोस्टल रोडच्या पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी-सी फेसवरील एक मार्गिकेची वाहतूक पाच महिन्यांसाठी बंद राहणार आहे. वाहतूक विभागानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. खान अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदू माधव जंक्शन ते जे.के.कपूर जंक्शन प्रभादेवीच्या दिशेनं जाणारी मार्गिका ४ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. या मार्गिकेवर केवळ वरळी सी-लिंकवर जाणारी वाहतूक सुरू राहील. 

दरम्यान, या कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून खान अब्दुल गफार खान फ्लायओव्हर ते वरळी नाका-पोदार जंक्शन या मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यासोबतच बिंदू माधव जंक्शनहून उजवीकडे वळल्यावर सर पोचखानवाला मार्ग येथून जे.के.कपूर जंक्शन येथे पोहोचता येईल. 

वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आलेलं पत्रक...

Web Title: One lane of Worli sea face closed for traffic for coastal road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई