Join us

कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद

By जयंत होवाळ | Published: November 06, 2023 8:03 PM

कोस्टल रोडची एक मार्गिका नोव्हेंबरपर्यंत सुरू करून मार्ग सुरू करण्याचा पालिकेचा मानस होता.

मुंबई: कोस्टल रोड पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी सी फेसवरील एका मार्गिकेची वाहतूक सात महिने बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.४ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत मार्गिका वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल. सी फेसच्या खान अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदूमाधव ठाकरे जंक्शन ते जे. के. कपूर जंक्शन, प्रभादेवीच्या दिशेने जाणारी ही मार्गिका आहे.

कोस्टल रोडची एक मार्गिका नोव्हेंबरपर्यंत सुरू करून मार्ग सुरू करण्याचा पालिकेचा मानस होता. मात्र तसे करण्याचे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर मार्गिका सुरू करता आली नाही. आता मे २०२४ पर्यंत ही मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला वेग देण्यासाठी  खान अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदूमाधव ठाकरे जंक्शन ते जे. के. कपूर जंक्शनकडे जाणारी मार्गिका बंद ठेवून केवळ वरळी सी-लिंकवर जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून खान अब्दुल गफार खान उड्डाणपूल ते वरळी नाका-पोदार जंक्शन या मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यासोबतच बिंदूमाधव ठाकरे जंक्शनहून उजवीकडे वळल्यावर सर पोचखानवाला मार्ग येथून जे. के. कपूर जंक्शन येथे पोहोचता येईल, असे वाहतूक शाखेच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई