‘वन अबव्ह’चे संचालक आणखी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 05:54 AM2018-02-09T05:54:18+5:302018-02-09T05:54:21+5:30

कमला मिल आगप्रकरणातील आरोपी वन अबव्हच्या संचालक क्रिपेश आणि जिगर संघवीसह अभिजित मानकरला पीएफ घोटाळाप्रकरणी गुरुवारी अटक दाखवण्यात आली आहे.

One more director of 'One Hour' | ‘वन अबव्ह’चे संचालक आणखी अडचणीत

‘वन अबव्ह’चे संचालक आणखी अडचणीत

Next

मुंबई : कमला मिल आगप्रकरणातील आरोपी वन अबव्हच्या संचालक क्रिपेश आणि जिगर संघवीसह अभिजित मानकरला पीएफ घोटाळाप्रकरणी गुरुवारी अटक दाखवण्यात आली आहे. तिघेही कमला मिल आगप्रकरणी कोठडीत आहेत.
वन अबव्ह आणि मोजोस् बिस्ट्रो पबला २८ डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला, तर ४१ जण जखमी झाले. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत मोजोस्चे युग पाठक, युग तुली आणि वन अबव्हचे क्रिपेश संघवी, जिगर संघवी, अभिजित मानकर या संचालकांना बेड्या ठोकल्या. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यादरम्यान वन अबव्हवर एमआरटीपी अंतर्गतही गुन्हे दाखल केले. त्यानंतर कर्मचाºयांचा ८ लाख ६५ हजारांचा पीएफ भरला नाही म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी सांगितले.

Web Title: One more director of 'One Hour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.