Join us

वन मुंबई मेट्रो कार्ड सेवेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:06 AM

मुंबई : वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान मेट्रो सेवा चालविणाऱ्या मुंबई मेट्रो वनने प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्याची परंपरा पुढे ठेवत ...

मुंबई : वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान मेट्रो सेवा चालविणाऱ्या मुंबई मेट्रो वनने प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्याची परंपरा पुढे ठेवत गुरुवारी वन मुंबई मेट्रो कार्ड सेवेत दाखल केले आहे. आता हे कार्ड मेट्रो प्रवासासाठी वापरता येणार असून, पुढे ते बेस्ट आणि लोकलसह उर्वरित वाहतूक सेवेसाठीदेखील वापरता येईल, असा दावा मुंबई मेट्रो वनने केला आहे.

मुंबई मेट्रो वनच्या म्हणण्यानुसार, प्रथमच ई-बॅलेन्स आणि वॉलेट बेस्ड चिप बॅलन्ससह सामान्य कार्डप्रमाणे काम करणारे अनोखी चिप आधारित कार्ड सादर केले गेले आहे. अतिरिक्त पाकीट असलेली ही चिप भारतात प्रथमच ट्रान्झिट सिस्टमच्या वापरासाठी ट्रान्झिट सिस्टममध्ये आणली गेली. ई-बॅलन्सचा उपयोग खरेदी-विक्री, देयके आदी ऑनलाईन व्यवहारासाठी केला जाऊ शकतो. हे कार्ड कॉन्टॅक्टलेस किंवा टॅप-अँड-गो तंत्रज्ञानाच्या चाचणीनंतर सादर केले गेले आहे.

मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल शुभोदय मुखर्जी यांनी सांगितले, हे तंत्रज्ञान जलद, संपर्करहित आणि कॅशलेस प्रवास सुनिश्चित करेल. जगातील कोठेही दिलेली डेबिट / क्रेडिट कार्ड मेट्रोवर स्वीकारता यावी यासाठी मुंबई मेट्रो वनच्या पुढाकारालाही यात जोड देण्यात आली आहे.