Join us  

एक धाव राष्ट्रीय एकात्मतेसाठी!

By admin | Published: October 11, 2014 11:05 PM

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने खारघरमध्ये मॅरेथॉन स्पध्रेचे उद्या रविवारी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.3क् वाजता आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : राष्ट्रीय एकात्मता टिकून रहावी, तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणा:या शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने खारघरमध्ये मॅरेथॉन स्पध्रेचे उद्या रविवारी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.3क् वाजता आयोजन करण्यात आले आहे. सेंट्रल पार्क येथून या स्पर्धेला सुरूवात होणार असून लोकमत या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या हीरक महोत्सवी दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेसाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. ही दौड 5 किमीच्या परिसरात होणार आहे. यावेळी सीआरपीएफ पोलीस, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्यामधील एकात्मतेचे दर्शन घडणार आहे. देशासाठी अनेक जवान सीमेवर शहीद होत असतात. याशिवाय दहशतवादी हल्ल्यातही अनेकांना वीरमरण येते. अशा शहिदांचा आदरांजली वाहण्यासाठी हा स्त्युत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. 
या स्पध्रेमध्ये नवी मुंबईसह पनवेल परिसरातील विविध शाळांतील 8क्क् हून अधिकजण सहभागी होणार आहेत, त्याचबरोबर सीआरपीएफ, आरएएफ, विविध सुरक्षा दलाचे कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होतील. स्पध्रेतील पहिल्या आठ विजेत्यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. 
मॅरेथॉन स्पध्रेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्घाटनाला गायक शंकर महादेवन, सिध्दार्थ महादेवन, अभिनेता रवी किशन, खेळाडू अभय कुलविल्ला,  विविध फोर्सचे प्रमुख, पदाधिकारी आणि जवान उपस्थित राहणार आहेत.
 
मध्यप्रदेशमध्ये 1939 साली सीआरपीएफची स्थापना झाली. सीआरपीएफच्या चांगल्या कामामुळे 1986 मध्ये पहिली महिला बटालियन स्थापन करण्यात आले, त्यानंतर आतापर्यत आणखी दोन महिला बटालियनची स्थापना करण्यात आली. 1992 मध्ये आरएएफची स्थापना करून या माध्यमातून देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम केले जात आहे. नक्षलवादाविरोधात लढण्यासाठी 2क्क्9 रोजी अॅक्शन फोर्सची स्थापना करण्यात आली होती. याच धर्तीवर मुंबई आणि नवी मुंबईच्या सुरक्षितेसाठी 1992 मध्ये खारघरमध्ये सीआरपीएफची स्थापना करण्यात आली आहे. खारघर सीआरपीएफमध्ये एक हजारहून अधिक जवान कार्यरत आहेत. नवी मुंबई, मुंबई, ठाणो, धुळे, जळगाव आणि औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम या खारघर सीआरपीएफच्या माध्यमातून केले जात आहे.