बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 07:29 AM2020-01-22T07:29:45+5:302020-01-22T07:30:26+5:30

2014 साली हिंदुत्व, हिंदू मतांचे विभाजन आणि 25 वर्षांचे नाते यांचा विचार न करता अत्यंत निर्घृण पद्धतीने भाजपाने शिवसेनेशी युती तोडली. त्यांचे हिंदुत्व वगैरे ढोंग ठरले.

One to speak and the other to do so, the BJP should see its true face in the mirror; Shiv Sena Criticized | बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला 

बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला 

googlenewsNext

मुंबई - 2014 साली राष्ट्रवादीने भाजपला उघड पाठिंबा दिला व त्यामागे गुरूमहाराजांची इच्छा व दिशा होती. हे सत्य स्वीकारले तर शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भाजपने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहणे गरजेचे आहे. 2014 सालचीच शिवसेना आजही आहे. भाजपला  ‘105’ असूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. कारण भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे 2019 सालीही झाले. त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. सोनिया गांधी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाला लगावला आहे. 

तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने फारशी खळखळ किंवा खळबळ होण्याचे कारण नव्हते. चव्हाणांचा दावा मुंबईतील सौम्य थंड हवेत वाहून गेला. शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने यावर गांभीर्याने मत व्यक्त केल्याचे दिसत नाही; पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा इतका गांभीर्याने घेतला की, दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत विझलेली चिलीम फुंकण्याचा ते प्रयत्न करीत होते असा चिमटाही देवेंद्र फडणवीस यांना काढला आहे. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे   

  • 2014 सालचीच शिवसेना आजही आहे. भाजपला ‘105’ असूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. कारण भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे 2019 सालीही झाले. 
  • त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरूमहाराजांनी प्रयत्न केले तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. 

Image result for shiv sena and bjp

  • 2014 साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपटय़ाचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वतःच्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर महाराष्ट्र भाजपने संशोधन सुरू  केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खनन म्हणणे सोयीचे ठरेल. 
  • पृथ्वीराज चव्हाण काय बोलले त्यात आम्हाला पडायचे नाही; पण यानिमित्ताने भाजप आपला चेहरा स्वतःच ओरबाडीत आहे. खरेतर 2014 साली भाजपचाच खरा चेहरा उघड झाला व तो संपूर्ण देशाने पाहिला. पृथ्वीराज चव्हाण जे सांगतात त्यात ‘लॉजिक’ नावाचा प्रकार अजिबात नाही हे आधी मान्य केले पाहिजे. 

Related image

  • 2014 साली हिंदुत्व, हिंदू मतांचे विभाजन आणि 25 वर्षांचे नाते यांचा विचार न करता अत्यंत निर्घृण पद्धतीने भाजपाने शिवसेनेशी युती तोडली. त्यांचे हिंदुत्व वगैरे ढोंग ठरले. हा भाजपचा पहिला मुखवटा उतरला, पण त्यानंतरही खरा चेहरा बाहेर आला नाही. कारण एका मुखवटय़ावर त्यांचे भागत नाही. 
  • 2014 सालात भाजप-शिवसेना वेगळे लढले तसे काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळे लढले. चौरंगी लढतीत भाजप 122 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. शिवसेनेने स्वबळावर 63 जागा घेतल्या. काँग्रेस 42 तर राष्ट्रवादी 41 जागांवर थांबले. म्हणजे विधानसभा त्रिशंकूच ठरली. 
  • पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला व सत्ताधारी काँग्रेस थेट तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. त्यामुळे काँग्रेसला त्यावेळी ‘आवाज’ नव्हता. चव्हाण यांच्याकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. 

Image result for shiv sena congress ncp

  • शिवसेना विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होती व भाजप पुन्हा हिंदुत्व वगैरे नात्यांची जाळी फेकू लागला होता. सरकार स्थापनेचे घोंगडे लटकलेच होते. त्यावेळी ध्यानीमनी नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल पुढे आले व त्यांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. येथे भाजपचा दुसरा मुखवटा गळून पडला. 
  • 2014 साली हे नाटय़ घडत असताना शिवसेनेने चेहरा लपवलेला नव्हता. शिवसेना उजळ माथ्याने वावरत होती. मुखवटय़ाचे कारखाने भाजपकडेच होते. ‘लॉजिक’ म्हणाल तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने आजच्याप्रमाणे एकत्र यावे असे जबरदस्तीने ठरवले असते तरी ‘आकडा’ जमत नव्हता. 
  • मारून मुटकून 149 चा आकडा होता व तो धोकादायक होता. ते काठावरचे बहुमत होते व घोडेबाजारात मशहूर असलेले भाजपवाले साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून तोडफोड करायला तयार होते. 

Related image

 

Web Title: One to speak and the other to do so, the BJP should see its true face in the mirror; Shiv Sena Criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.