Join us

एक पाऊल यशाकडे; आरेच्या आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 8:40 PM

आजही ही आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळी आणि त्याबद्दल स्वच्छता पाळणे याबद्दल जनजागृती नसून अशा महिलांमध्ये आपण जनजागृती केली आहे.

मुंबई: गोरेगाव (पूर्व ) आरे मधील खडकपाडा आणि वाणीचा पाडा येथील 360 आदिवासी महिलांना नुकतेच मोफत सॅनिटरी पॅड आणि इम्युमिटी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

पॅडवूमन म्हणून ओळख असलेल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व ती फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.भारती लव्हेकर यांनी त्यांच्या डिजिटल पॅड बँकेतून या महिलांना  लागणारे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले असून त्यांची मोलाची मदत अभिषेक सामाजिक व शैक्षणिक शिक्षण संस्था मिळाली आहे. गेली 5 महिने येथील  आरेच्या आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येत आहे.

आजही ही आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळी आणि त्याबद्दल स्वच्छता पाळणे याबद्दल जनजागृती नसून अशा महिलांमध्ये आपण जनजागृती केली आहे. जेणेकरून आदिवासी महिला कित्येक आजारांना बळी पडत आहे त्यामध्ये जनजागृती होऊन आणि सॅनिटरी पॅड वापरून आजाराचे प्रमाण कमी होईल असा विश्वास अभिषेक सामाजिक व शैक्षणिक शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे यांनी व्यक्त केला.

आजही ही आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळी आणि त्याबद्दल स्वच्छता पाळणे याबद्दल जनजागृती नसून अशा महिलांमध्ये आपण जनजागृती केली आहे. जेणेकरून आदिवासी महिला कित्येक आजारांना बळी पडत आहे त्यामध्ये जनजागृती होऊन आणि सॅनिटरी पॅड वापरून आजाराचे प्रमाण कमी होईल. आमदार लव्हेकर यांच्या सहकार्याने आपल्या संस्थेमार्फत पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी महिलांपर्यंत सॅनिटरी पॅड  त्यांच्यापर्यंत आपण पोचवणार आहोत जेणेकरू आदिवासी महिलांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्या महिला निरोगी आणि सुदृढ राहतील असा ठाम विश्वास सुनीता नागरे यांनी व्यक्त केला.

यावेळी आदिवासी महिलांना मार्गदर्शन करतांना सुनीता नागरे म्हणाल्या की, आज आपल्या देशात वयोगट 13 ते 50 या मासिकपाळीत मोडणाऱ्या 33.5 कोटी स्त्रियांपैकी फक्त 15 टक्के स्त्रिया सॅनिटरी पॅडचा वापर करतात. या 37 वर्षाच्या मासिकपाळीच्या काळात स्त्रियांना 2220 दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्याची 6 वर्षे मासिक पाळीचा कालावधीत जातो. आजही जगात या संवेदनशील विषयाकडे गांभीर्याने स्त्रिया पाहत नसल्याबद्दल खंत व्यक्त करून मासिक पाळीत स्त्रिया कपडे,गोणपाट,वाळू,झाडाची पाने तर नैरोबीसारख्या देशात कोंबडीचे पीस यांचा सॅनिटरी पॅड म्हणून वापर करतात,तर नैरोबीत मासिक पाळीचा अडसर सुखामध्ये येऊ नये म्हणून पुरुष दुसरे लग्न करतात अशी धक्कादायक आकडेवारी त्यांनी दिली.या गहन विषयात घरातील पुरुष मंडळी,मुलांनी स्त्रीची मानसिकता समजून घेऊन तिला मानसिक आधार दिला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.