मुंबईचे कासव जाणार पाकिस्तानला; सॅटेलाइट टॅगिंग केलेले ‘प्रथमा’ कासव सध्या मुंबई मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 09:00 AM2022-03-25T09:00:02+5:302022-03-25T09:01:24+5:30

‘प्रथमा’ कासवाने वेळासपासून तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पार केले

One tagged turtle in race to reach pakistan | मुंबईचे कासव जाणार पाकिस्तानला; सॅटेलाइट टॅगिंग केलेले ‘प्रथमा’ कासव सध्या मुंबई मुक्कामी

मुंबईचे कासव जाणार पाकिस्तानला; सॅटेलाइट टॅगिंग केलेले ‘प्रथमा’ कासव सध्या मुंबई मुक्कामी

googlenewsNext

- सचिन लुंगसे

मुंबई : समुद्री कासवांचा अभ्यास करण्यासाठी रत्नागिरी येथे सॅटलाइट टॅगिंग करण्यात आलेल्या कासवांपैकी ‘प्रथमा’ कासवाने वेळासपासून तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. हे कासव सध्या मुंबई मुक्कामी आहे. येथून ते गुजरातकडे आणि पुढे पाकिस्तान किंवा ओमानच्या दिशेने जाईल, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

देशातील समुद्रकिनारी प्रथमच समुद्री कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले. या कासवांनी कोकणात अंडी घातल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. टॅगिंगद्वारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतात, याची माहिती गोळा केली जात आहे. 

टॅगिंग केलेल्या कोणत्या कासवाने, किती केला प्रवास? (किमी)
    किती प्रवास    सध्या कोण, कुठे?
प्रथमा      वेळासपासून २५०    डहाणूपासून ८६
सावणी    आंजर्लेपासून १०१    मुरुडपासून ७३
वनश्री    गुहागरपासून ७४    गणेशगुळेपासून ५
रेवा    गुहागरपासून १५६    तोंडवलीपासून ५

Web Title: One tagged turtle in race to reach pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.