Join us

मुंबईचे कासव जाणार पाकिस्तानला; सॅटेलाइट टॅगिंग केलेले ‘प्रथमा’ कासव सध्या मुंबई मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 9:00 AM

‘प्रथमा’ कासवाने वेळासपासून तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पार केले

- सचिन लुंगसेमुंबई : समुद्री कासवांचा अभ्यास करण्यासाठी रत्नागिरी येथे सॅटलाइट टॅगिंग करण्यात आलेल्या कासवांपैकी ‘प्रथमा’ कासवाने वेळासपासून तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. हे कासव सध्या मुंबई मुक्कामी आहे. येथून ते गुजरातकडे आणि पुढे पाकिस्तान किंवा ओमानच्या दिशेने जाईल, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.देशातील समुद्रकिनारी प्रथमच समुद्री कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले. या कासवांनी कोकणात अंडी घातल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. टॅगिंगद्वारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतात, याची माहिती गोळा केली जात आहे. टॅगिंग केलेल्या कोणत्या कासवाने, किती केला प्रवास? (किमी)    किती प्रवास    सध्या कोण, कुठे?प्रथमा      वेळासपासून २५०    डहाणूपासून ८६सावणी    आंजर्लेपासून १०१    मुरुडपासून ७३वनश्री    गुहागरपासून ७४    गणेशगुळेपासून ५रेवा    गुहागरपासून १५६    तोंडवलीपासून ५