खरिपाच्या एकतृतीयांश पीक क्षेत्राचा उतरविला विमा; १ कोटीहून अधिक अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 04:18 AM2019-08-03T04:18:45+5:302019-08-03T04:18:55+5:30
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा ७२ टक्के वाटा
पुणे : पीक विमा रक्कमेच्या परताव्यावरुन उडालेले राजकीय रणकंदन, मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचा घसरलेला टक्का, निसर्गाचे बदलत असलेले चक्र, या पार्श्वभूमीवर यंदा पीक विम्यासाठी तब्बल १ कोटी ७ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील ७२% अर्ज मराठवाड्यातील आहेत. त्याखालोखाल विदर्भातील शेतकºयांचे अर्ज आहेत. या सर्व शेतकºयांनी खरीपाच्या एकतृतीयांश क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण घेतले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकºयांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलै वरुन ३१ जुलै पर्यंत वाढविली होती. पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना द्याव्या लागणाºया शुल्कातील काही वाटा शेतकरी तर उर्वरित भाग केंद्र आणि राज्य सरकार उचलते. जूनमध्ये पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेतकºयांनी पीक विमा घेणे पसंत केले आहे. राज्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र दीड कोटी हेक्टर आहे. त्या पैकी तब्बल ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा शेतकºयांनी उतरविला आहे. गत खरीप हंगामात (२०१८) राज्यातील ८५ लाख ६ हजार ८२८ शेतकºयांनी ४९ लाख २० हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. यंदा शेतकºयांची संख्या १ कोटी सात लाख ६२ लाख ३२५ झाली असून, त्यात मराठवाड्यातील शेतकºयांची संख्या तब्बल ७८ लाख ४८ हजार २८८ इतकी आहे. खालोखाल पुणे विभागातील ११ लाख २७ हजार ४३५ आणि अमरावती विभागातील १० लाख ५४ हजार ८०९ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत.
१८ हजार कोटींचे विमा
संरक्षण मिळणार
शेतकºयांनी ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला असून, त्या पोटी शेतकºयांनी ४५० कोटी ५ लाख ६३ हजार ४३३ रुपये भरले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने विमा हप्त्यापोटी प्रत्येकी १५९९ कोटी रुपये अनुदान म्हणून दिले आहे. यातून तब्बल १८ हजार १०३ कोटी २६ लाख ७९ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
विभागनिहाय सहभागी शेतकरी
विभाग सहभागी भरलेली रक्कम क्षेत्र
कोकण ३५,८०९ १,७३,३२,२०५ २१५१४.०१
नाशिक ३,२२,५३९ २९,५३,३४,७९२ २५०१४४.८३
पुणे ११,२७,४३५ ४१,६७,९१,१०० ७५१३४१.८४
कोल्हापूर ९९,८५३ २,७९,६६,३१७ ५६०२१.०६
औरंगाबाद ४१,८२,७५७ १४३,०३,१८,६६१ १५५८४२१.१३
लातूर ३६,६५,५३१ १४३,७८,०७,२७३ १८०५२५७.४१
अमरावती १०,५४,८०९ ६६,२६,०६,८२१ ७६२८२५.१९
नागपूर २,७३,५९२ १६,२४,०६,२६१ १७३१५५.९३
एकूण १,०७,६२,३२५ ४४५,०५,६३,४३३ ५३,७८,६८१.४०