लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सोमवारी काेराेनाचे १००८ रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा तीन लाख ३४ हजार ५७२वर पोहोचला आहे. चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ५०४वर पोहोचला आहे.
९५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या तीन लाख ११ हजार ४०७वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या दहा हजार ७७९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी २२५ दिवस इतका आहे.
मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या २० चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. १९३ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३४ लाख ३४ हजार ६१० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.