पाच मुंबईकरांमागे एकच वृक्ष, पर्यावरण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 07:13 AM2018-05-08T07:13:19+5:302018-05-08T07:13:19+5:30

मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकार मुंबईतल्या पर्यावरणाच्या नावाने कितीही गोडवे गात असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. येथील वृक्षांची संख्या दिवसागणिक घटत असून, मुंबईचा विचार करता येथे पाच माणसांमागे केवळ एकच वृक्ष असल्याची वस्तुस्थिती आहे.

One tree behind the five Mumbaikars, the environmental hazard | पाच मुंबईकरांमागे एकच वृक्ष, पर्यावरण धोक्यात

पाच मुंबईकरांमागे एकच वृक्ष, पर्यावरण धोक्यात

Next

मुंबई  - मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकार मुंबईतल्या पर्यावरणाच्या नावाने कितीही गोडवे गात असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. येथील वृक्षांची संख्या दिवसागणिक घटत असून, मुंबईचा विचार करता येथे पाच माणसांमागे केवळ एकच वृक्ष असल्याची वस्तुस्थिती आहे.
वृक्ष गणनेनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून, उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत. वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी यासंदर्भात सांगितले, जागतिक स्तरावरचा विचार करता कॅनडामधील वृक्षांची संख्या ३१८ अब्ज आहे; येथे एका माणसामागे तब्बल ८ हजार ९५३ वृक्ष आहेत. ब्राझिलमधील वृक्षांची संख्या ३०१ अब्ज आहे; येथे एका माणसामागे तब्बल १ हजार ४९४ वृक्ष आहेत. चीनमध्ये १३९ अब्ज वृक्ष आहेत; येथे एका माणसामागे १०२ वृक्ष आहेत. तर भारता लोकसंख्या १ अब्ज २६ कोटी ७० लाख असून, वृक्षांची संख्या ३५ अब्ज आहे. महत्त्वाचे म्हणजे देशात एका माणसामागे फक्त २८ झाडे आहेत.
एकंदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचा विचार करता मुंबई महापालिकेच्या वृक्ष गणनेनुसार येथील वृक्षांची संख्या २९ लाख ७५ हजार २८३ आहे. शिवाय आरे कॉलनीमध्ये ४ लाख २० हजार वृक्ष आहेत. आणि मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक माणसामागे येथील वृक्षांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. परिणामी, मुंबई महापालिकेसह उर्वरित प्राधिकरणे पर्यावरणाच्या नावाने गोडवा गात असली तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी असून, वृक्षांचे प्रमाण दिवसागणिक कमी होत आहे.
पाच माणसांमागे फक्त एकच वृक्ष आहे. याचा परिणाम मुंबईच्या पर्यावरणावर होत असून, मुंबईकरांच्या आरोग्यासाठीदेखील ही धोक्याची घंटा आहे.

वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिलेल्या माहितीनुसार...
च् कॅनडामधील वृक्षांची संख्या ३१८ अब्ज आहे; येथे एका माणसामागे तब्बल ८ हजार ९५३ वृक्ष आहेत.
च् ब्राझिलमधील वृक्षांची संख्या ३०१ अब्ज आहे; येथे एका माणसामागे तब्बल १ हजार ४९४ वृक्ष आहेत.
च् चीनमध्ये १३९ अब्ज वृक्ष आहेत; येथे एका माणसामागे १०२ वृक्ष आहेत.
च् भारताचा विचार करता येथील लोकसंख्या १ अब्ज २६ कोटी ७० लाख असून, वृक्षांची संख्या ३५ अब्ज आहे. म्हणजे देशात एका माणसामागे फक्त २८ झाडे आहेत.
विकासाच्या नावाखाली मेट्रो व अन्य प्रकल्पांसाठी वृक्षांची कत्तल होत आहे. नवीन वृक्ष लावले जात असले तरी त्याच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वृक्ष लागवडीचे केवळ कार्यक्रम करण्यापेक्षा लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धनही व्हावे अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Web Title: One tree behind the five Mumbaikars, the environmental hazard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.