- मनीषा म्हात्रेमुंबई : वेळ सायंकाळी साडे सातची. मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटवर आलेल्या महिला पत्रकाराच्या एका टिष्ट्वटने पोलिसांवर टीकेची झोड उठवली. पोलीस शिपायाने जबरदस्तीने टॅक्सीत बसण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केल्याचा आरोप पोलिसावरच करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान आझाद मैदान पोलिसांसमोर उभे ठाकले.रात्री ९ वाजता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वसंत वाखारे यांनी तपासाची धुरा हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्हींचा शोध घेत टॅक्सी क्रमांक (एमएच ०१ एटी १४५२) मिळवला. त्यात ही होती टुरिस्ट टॅक्सी. आरटीओशिवाय पूर्ण माहिती मिळणे अशक्यच होते. वाखारेंनी खबरी कामाला लावले. रात्रीचे पावणे बारा वाजले. घड्याळाचा काटा पुढे जात होता तसतसे वरिष्ठांचे फोनही खणाणत होते. एन. एम. जोशी मार्ग परिसरात राहत असलेल्या टॅक्सीचालकाच्या पुतण्याची माहिती मिळाली. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. मात्र गाडी काकाच्या नावावर असून ते गावी असल्याचे समजले. त्याच्या जागेवर पप्पू गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली. खालसा कॉलेज परिसरातून त्यांनी पप्पूला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून रात्री ३च्या ठोक्याला वडाळ्याच्या मूळ टॅक्सीचालक मोहम्मद असाउद्दिन खानपर्यंत पोलीस पोहोचले; आणि आरोपींच्या शोधापर्यंतच्या या सहा तासांच्या धावपळीत या टिष्ट्वटमागील सत्य हळूहळू उलगडत गेले. मुळात महिला पत्रकाराने आझाद मैदान परिसराच्या हद्दीतून चर्चगेटच्या दिशेने जाण्यासाठी टॅक्सी पकडली. त्यादरम्यान पोलिसांच्या वेषातील इसम टॅक्सीचा शोध घेत होता. मात्र टॅक्सी मिळत नसल्याने सिग्नलजवळ थांबलेल्या खानला त्यांनी सीआयडी आॅफिसपर्यंत सोडण्यास सांगितले. मात्र महिला पत्रकाराने त्यास नकार दिल्याने ती व्यक्ती निघून गेली. मात्र महिला पत्रकाराने नाटक रचल्याचे तपासाअंती समोर आले आणि अन् या टिष्ट्वटची ‘टिवटिव’ सहा तासांनी कमी झाली. खाकीवर उठलेल्या प्रश्नावर पूर्णविराम मिळाला.अशा प्रकारे एका टिष्ट्वटवरून घडलेल्या घटनेचा उलगडा, ११ आॅगस्ट २०१२ची दंगल, मुंबईभर मनसे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उफाळलेल्या वादानंतर करण्यात आलेली तोडफोड अशा क्लिष्ट आणि चित्र-विचित्र घटना आझाद मैदान पोलिसांनी सक्षमपणे हाताळल्या आहेत. अवघे ५ पोलीस निरीक्षक, २२ पीएसआय, ७ एसआय आणि अंमलदार असे १७९ पोलिसांचे मनुष्यबळ या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. किल्ला कोर्टाच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये या पोलीस ठाण्याचे कामकाज चालते. दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे आणि नेहमी व्यस्त असणारे म्हणूनही या पोलीस ठाण्याची ओळख आहे. राज्यभरातील आंदोलनकर्ते येथे नित्याने धडकत असतात. त्यामुळे या आंदोलनांवर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी येथील पोलिसांवर असते. पोलीस ठाण्यातील ८० टक्के मनुष्यबळ सतत बंदोबस्तासाठी तैनात असते. अवघ्या २० टक्के पोलीस मनुष्यबळावर दैनंदिन कामकाज चालते. चर्चगेट आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकांची बॉर्डर तसेच या परिसराबाहेरील सुरक्षा तसेच संशयितांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील या पोलिसांवर आहे. येथील गर्दीमुळे चोरीच्या घटनांची नोंद अधिक आहे. यावर रोख आणण्याचे विशेष आव्हानही येथील पोलिसांवर आहे. दुसरीकडे प्रमुख रुग्णालयांसह पालिकेचे मुख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालयाबरोबर शासकीय तसेच व्यावसायिक इमारती या भागात अधिक असल्याने येथील सुरक्षेची जबाबदारीही पोलिसांच्या खांद्यावर आहे. २०१६मध्ये एकूण ४१२ गुन्ह्यांची नोंद आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या दफ्तरी झाली. तर गेल्या वर्षी ४७३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिटेक्शनचा रेट ४२ टक्के होता. वाखारे यांनी आॅगस्टत पदभार स्वीकारल्यापासून तो ५९ टक्क्यांवर आला आहे, हे आझाद मैदान पोलिसांचे मोठे यश आहे.सर्व तक्रारींकडेबारकाईने पाहण्याचा प्रयत्नपोलीस ठाण्यात दाखल होणाºया दखलपात्र गुन्ह्यांबरोबरच अदखलपात्र गुन्हे, तक्रारी मार्गी लावण्याचा कर्मचारीवर्गाकडे तगादा असतो. यामुळे पुढे मोठ्या स्वरूपात होणारा गुन्हा वेळीच टाळण्यास मदत होते. त्याचा अहवाल मी वेळोवेळी घेत असतो. अशात नागरिकांनीही थोडे सतर्क राहणे गरजेचे आहे.- वसंत वाखारे,वरिष्ठ पोलीस निरीक्षकआझाद मैदान अंतर्गत प्रमुख ठिकाणेजी. टी. रुग्णालय, कामा रुग्णालय, ईएनटी रुग्णालय, आझाद मैदान, चर्चगेट आणि सीएसएमटी रेल्वे स्थानक बॉर्डर, शासकीय कार्यालये, पालिका मुख्यालय, पोलीस आयुक्त मुख्यालय, सीआयडी कार्यालय, सत्र न्यायालय.अधिकारीही ३ शिफ्टच्या प्रतीक्षेतकामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी येथील अंमलदारासाठी तीन सत्रांमध्ये कामाची पद्धत सुरू करण्यात आली. अशात अधिकारी वर्गासाठीही अशा पद्धतीने मुभा मिळावी यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत वाखारे प्रयत्नशील आहेत.प्रमुख जबाबदारी : आझाद मैदानातील बंदोबस्ताबरोबरच येलोगेट पोलीस ठाणे, अमलीपदार्थविरोधी कक्ष, आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपींना आझाद मैदान पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात येते. त्यामुळे त्यावरही लक्ष ठेवणे जिकिरीचे असते.परिमंडळ - १लोकसंख्या - २ लाखच्पोलीस उपायुक्त - मनोज शर्माबीट चौकी - ४हुतात्मा चौक, फोर्ट, धोबी तलावयेथे करा तक्रारवरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत वाखारे - ९८७००८२१४८, ०२२ - २२६७८११५पोलीस ठाणे - ०२२ - २२६२०२९५, २२६२०६९७ई -मेल आयडी -ps.azadmaidan.mum@mahapolice.gov.in
एक ट्विट... त्यासाठीचे ते सहा तास! आझाद मैदान पोलिसांची कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 6:53 AM