Join us

हार कर जितनेवालो को 'विकास' कहते है, निवडणुकीत पराभूत होऊनही 'तो' जिंकला

By महेश गलांडे | Published: January 22, 2021 9:08 AM

हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है... शाहरुखचा हा डायलॉग लातूर जिल्ह्यातील कोनाळीकर गावच्या विकासने खरा करुन दाखवलाय. कारण, गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ 12 मतं मिळाल्यानं त्याचा पराभव झाला

ठळक मुद्देहारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है... शाहरुखचा हा डायलॉग लातूर जिल्ह्यातील कोनाळीकर गावच्या विकासने खरा करुन दाखवलाय. कारण, गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ 12 मतं मिळाल्यानं त्याचा पराभव झाला

मुंबई/लातूर - तुम्हाला भलेही गावात कमी किंमत असेल, किंवा गावात तुम्हाला मानणारा वर्गही तोकडा असेल, पण तुमची एक कृती तुम्हाला सोशल मीडियावर हिरो बनवते. त्यानंतर, गावकरीही तुमच्या प्रेमात पडतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, सोशल मीडियातून एका दिवसांत फेमस झालेल्यांची संख्या कमी नाही. आता, निवडणुकीतील पराभवानंतर एक युवक इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ 12 मतं मिळावत या तरुणाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, पराभवापेक्षा त्याच्या मनाचा मोठेपणा त्याला पराभूत केल्यानंतरही जिंकून गेला. म्हणून, शाहरुख खानच्या बाजीगर चित्रपटातील डायलॉग या तरुणाला तंतोतंत लागू पडतो. 

हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है... शाहरुखचा हा डायलॉग लातूर जिल्ह्यातील कोनाळीकर गावच्या विकासने खरा करुन दाखवलाय. कारण, गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ 12 मतं मिळाल्यानं त्याचा पराभव झाला. मात्र, तरीही त्याला मतदान करणाऱ्या 12 मतदारांचे आभार मानल्यामुळे तो सोशल मीडियावर हिरो ठरला. लाखो नेटीझन्सची मने त्याने जिंकली आहेत. त्यामुळे, आता गावच्या कठ्ठ्यापासून ते सोशल मीडियातील वेगवेगळ्या कट्ट्यांवर त्याचीच चर्चा आहे. म्हणून, हारकर जितनेवाले को विकास कहतै है... असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कोनाळी गावचा विकास शिंदे सध्या अहमदपूर इथं पॉलिटेक्निकचं शिक्षण घेत आहे. काही काळासाठी तो पुण्यातही वास्तव्यास होता. पुढं गावात निवडणुकीचे वारे वाहत होते, अशातच आपणही गावच्या विकासात हातभार लावला पाहिजे, गावच्या राजकारणाा भाग बनलं पाहिजे, असे वाटल्याने तो निवडणुकीच्या रिंगणात उभारला. मात्र, गावकऱ्यांनी विकास नाकारला. केवळ 12 मतं विकासला या निवडणुकीत पडली. तरीही, हताश न होता, बारा मतदारांचे आभार विकासने मानले. डिजिटल फ्लेक्स उभारुन त्याने सर्वांचे लक्ष वधेले. त्याने डिजिटल बोर्डवर लिहिलेला मजकूर सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे. त्यामुळे, त्याचा हा डिजिटल फलक सध्या व्हायरल होत आहे. 

'वाटलं होतं गड्या आपला गाव बरा ....पण तुम्ही म्हणलो पसारा भरा ....आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा.समाजाने नाकरल... गावानं नाकरलं, मात्र आम्हाला देश स्वीकारणार...'

पराभवाचे हे शल्य असं लिहून बॅनरवर, आपल्याला मिळालेल्या अवघ्या 12 मतांसाठीही या पठ्ठ्यानं मतदारांचे आभार मानले आहेत. 'सात जन्म तुमचे हे उपकार विसरणार नाही', असं लिहलेले बॅनर गावात लावले.

'तुमच्या मताचे देशात नाव करीन', असं म्हणत आता देशात नाव करेन, असे आश्वासनच विकासने गावकऱ्यांना आणि त्या 12 मतदारांना दिलंय. 

टॅग्स :ग्राम पंचायतनिवडणूकलातूर